

Former soldiers of Sainik Takli congratulate Indian soldiers for Operation Sindoor
सैनिक टाकळी : पुढारी वृत्तसेवा
सैनिकांचं गाव अशी ओळख असलेल्या सैनिक टाकळीतील माजी सैनिकांनी भारतीय सैनिकांचं अभिनंदन करत गरज पडल्यास सीमेवर जाऊन भारतीय सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून मॅुंह तोड जवाब देंगे, अशी जोशभरी भावना व्यक्त केली आहे.
भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य स्थिती कायम आहे. त्यामुळे युद्धासाठी 'आम्हालाही बोलवा', अशी विनंती सैनिक टाकळी येथील निवृत्त सैनिकांनी केली आहे. सैन्य दलानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. या बद्दल जिवाला फार बरे वाटले अशा प्रतिक्रिया देऊन माजी सैनिकांनी या धाडसी कारवाईचं स्वागत केलं आहे.
यापेक्षा आक्रमक धोरण राबवून भारतानं पाकिस्तानला नेस्तनाबूत करावं. वारंवार भारतीय हद्दीत दहशतवादी पाठवून हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला कायमचा धडा शिकवला पाहिजे अशी भावना व्यक्त केल्या. भारतीय सैन्य दलात सहभागी झालेले निवृत्त सैनिक हवालदार जनार्दन पाटील, हवालदार दादासाहेब पाटील यावेळी उपस्थित होते.
सक्षमपणे भारतीय सैन्यातील हवाई दल, नौदल आणि भूदलाच्या मागे सक्षमपणे निवृत्त सैनिकांची फळी खंबीरपणे उभी आहे. यामुळं सैनिकांनी पुरी जी जॉन से लढावं आणि पाकिस्तानला नेस्तनाबूत करावं अशी प्रतिक्रिया निवृत्त सैनिक सुभेदार मेजर आत्माराम पाटील यांनी दिली आहे.