गोवा

South Goa Lok Sabha : दक्षिण गोवा लोकसभा उमेदवारीवरून भाजपमध्ये नवा ट्विस्ट; ‘या’ महिलांची नावे चर्चेत

अविनाश सुतार


पणजी: लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोवा उमेदवारीसाठी भाजपध्ये अंतिम दोन इच्छुकांच्या नावांची चर्चा सुरू असताना यात नवा ट्विस्ट आला आहे. केंद्रीय नेतृत्वाने अचानक दक्षिण गोव्यासाठी महिला नेत्यांची नावे पाठविण्याचा आदेश दिल्यामुळे उमेदवारीवरून पुन्हा खलबते सुरू आहेत. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार भाजपच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक आज (दि. ४) पणजीत पार पडली. या बैठकीत काही महिला नेत्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. South Goa Lok Sabha

कोअर कमिटीच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद शेट तानावडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, भाजपने राजकारणात 30 टक्के महिलांना जागा देण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय भाजपच्या नेत्यांनी सर्व राज्यांना पुरुष उमेदवारांसोबत महिला उमेदवारांची नावे पाठवण्यास सांगितले आहे. उत्तर गोव्याचा उमेदवार जाहीर झालेला आहे. त्यामुळे दक्षिण गोवा लोकसभेसाठी महिला उमेदवारांची नावे पाठवण्याची सूचना केली आहे. South Goa Lok Sabha

South Goa Lok Sabha  या महिलांची नावे चर्चेत

दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार म्हणून महिला उमेदवारांची नावे पाठवण्याचे आदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिल्यामुळे सक्षम महिला उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. द. गो. जि. प. अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, फोंड्याच्या माजी नगराध्यक्ष डॉ. राधिका नायक, महिला आयोगाची माजी अध्यक्ष डॉ. विद्या गावडे, यांच्यासोबत सावित्री कवळेकर आणि गोमंतकीय कन्या शैफाली वैद्य यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

भारतीय राजकारणात पुरुषाच्या तुलनेत महिलांची संख्या फारच कमी आहे. स्वबळावर निवडून येणार्‍या महिला कमीच आढळतात. गोव्याच्या विधानसभेत 3 महिला आमदार आहेत. त्यातील दोन मंत्र्यांच्या पत्नी, तर एक आमदाराची पत्नी आहे. या तिन्ही महिला आमदार उत्तर गोव्यातील आहेत. त्यामुळे दक्षिण गोव्यात निवडून येणारी सक्षम महिला उमेदवार शोधण्याचे काम भाजपच्या कोअर कमिटीला करावे लागणार आहे.

यापूर्वी माजी खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजी आमदार दामोदर नाईक, सभापती रमेश तवडकर व आमदार दिगंबर कामत अशी पाच नावे दक्षिण गोव्याच्या उमेदवारीसाठी पाठवली होती. कामत व तवडकर यांनी माघार घेतल्याने अ‍ॅड. सावईकर, कवळेकर व नाईक यांच्या नावावर चर्चा झाली. शेवटच्या टप्प्यात अ‍ॅड. सावईकर व कवळेकर यांचीच नावे चर्चेत होती. मात्र आता महिलांची नावे पाठवण्यास सांगितले आहे. असे असले तरी अ‍ॅड. सावईकर व कवळेकर व नाईक यांची नावे पक्षाने नाकारलेली नाहीत, असेही मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले.

South Goa Lok Sabha  विजयाची क्षमता हाच निकष : मुख्यमंत्री

पुढील चार-पाच दिवस स्थानिक पातळीवर कार्यकर्ते व नेते यांना विश्वासात घेऊन महिलांच्या नावावर चर्चा होईल. त्यानंतर सर्व्हे केला जाईल. विजयाची क्षमता पाहून यातील काही नावे केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवली जातील. ही छाननी पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याने दक्षिण गोव्याच्या उमेदवाराची घोषणा तिसर्‍या किंवा चौथ्या यादीत होऊ शकते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कुणाला मिळेल उमेदवारी

उमेदवार निवडताना भाजपची सदस्य, भाजपची हितचिंतक व भाजपच्या परिवारातील महिला अशा तीन टप्प्यात चर्चा करण्यात येणार आहे. उमेवाराच्या विजयाची क्षमता पाहून उमेदवारी देण्याची सूचना आम्ही केंद्रीय निवडणूक समितीकडे करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पंतप्रधानांचा 6 रोजी महिलांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचा सन्मान करताना अनेक योजना आखल्या शौचालय, महिला स्वनिधी, कन्या समृद्धी, उज्ज्वला या योजना महिलांच्या विकासासाठी राबवण्यात येत आहेत. बुधवारी (दि. 6) पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10.30 वा. आभासी पद्धतीने देशभरातील महिलांशी संवाद साधणार आहेत. गोव्यातील सर्व महिलांनी या संवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT