Drug Case  Pudhari
गोवा

Goa Drug Case | मुंबई-गोवा पोलिसांचा 'जॉईंट ऑपरेशन' धमाका! केपे तालुक्यातील अवेडेत 2 किलो गांजा जप्त

Goa Drug Case | 2 किलो गांजा जप्त; मुंबई-गोवा पोलिसांची संयुक्त कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीवर आळा घालण्यासाठी मुंबई आणि गोवा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. गोव्यातील अवेडे या ग्रामीण भागात केलेल्या कारवाईत सुमारे २ लाख रुपयांचा दोन किलो गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांना जुन्या तपासादरम्यान या रॅकेटबाबत महत्त्वाची माहिती मिळाली होती. त्यानंतर गोवा पोलिसांच्या सहकार्याने केपे तालुक्यातील एका ठिकाणी छापा टाकण्यात आला.

या कारवाईत दोन किलो गांजा जप्त करण्यात आला. तपासात उघड झाले की, केपे आणि कुडचडे परिसरात मागील काही दिवसांपासून अमली पदार्थांची हालचाल वाढली होती. या नेटवर्कद्वारे गोव्यात गांजाचा पुरवठा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

यामुळे या रॅकेटचा विस्तार मोठ्या प्रमाणावर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांच्या मते, या प्रकरणात आणखी काही संशयितांचा सहभाग असू शकतो आणि त्यांचा शोध सुरू आहे.

तसेच या नेटवर्कचे इतर राज्यांशी असलेले संबंध तपासले जात आहेत. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या बेकायदेशीर हालचालींबाबत त्वरित माहिती द्यावी, जेणेकरून अमली पदार्थांच्या विरोधातील मोहिमेला अधिक बळ मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT