दीपक ढवळीकर 
गोवा

Goa MGP focus on 3 constituencies| तीन मतदारसंघांवर मगोचे लक्ष केंद्रित

दीपक ढवळीकर : सर्वसाधारण सभेनंतर भाजपशी चर्चा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : आगामी २०२७च्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगो) फोंडा, मडकई आणि शिरोडा या मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर नेते दीपक ढवळीकर यांनी संभाव्य उमेदवार आणि पक्षाच्या निवडणूक रणनीतीबाबत संकेत दिले. आजच्या बैठकीचे ठराव ३१ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे व त्यानंतर भाजपशी चर्चा केली जाणार आहे.

कोडार येथे झालेल्या मगोच्या कार्यकारिणी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दीपक ढवळीकर यांनी शिरोडा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची आपली इच्छा व्यक्त केली. तसेच मडकई मतदारसंघात मिथिल ढवळीकर चांगले काम करीत असून, त्यांच्या उमेदवारीचाही विचार केला जावा, असे त्यांनी सांगितले.

८ मतदारसंघाची समिती काढण्यात आली आहे तरी सुमारे २२ ते २४ मतदारसंघात अडीच ते ३ हजार मते मगोची आहेत. सर्व मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत असून यावेळी चांगली बाजी मारू शकतो असे सर्वे सांगतो मात्र मगो भाजपमध्ये युतीमध्ये असून ती साथ सोडायची नाही असे ढवळीकर म्हणाले.

मांद्रे मतदारसंघासाठी जीत आरोलकर यांना पक्षाची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याचेही ढवळीकर म्हणाले. कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या आगामी राजकीय भूमिकेसह विविध महत्त्वाच्या ठरावांवर चर्चा करण्यात आली. हे सर्व ठराव ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मगोच्या सर्वसाधारण सभेत मांडले जाणार आहेत. या सभेनंतर पक्षाची पुढील निवडणूक रणनीती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT