Online fraud case arrests Pune - ऑनलाईन फसवणूकप्रकरणी पुण्यातील दोघांना अटक

३९.०१ लाखांची फसवणूक, २३.१२ लाखांची रक्कम सुरक्षित
Digital Arrest Scam
Digital Arrest ScamPudhari
Published on: 
Updated on: 

पणजी : बनावट ऑनलाईन शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने गोव्यातील ६० वर्षीय व्यक्तीची तब्बल ३९.०१ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा सायबर क्राईम पोलिसांनी पुणे येथून अजिंक्य रवींद्र अभंग (रा. आळेफाटा-पुणे) व सागर प्रकाश ठोलवी (नारायणगाव-पुणे) या संशयितांना अटक केली. या कारवाईत फसवणूक झालेल्या रकमेपैकी २३.१२ लाख सुरक्षित करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Digital Arrest Scam
Mann Ki Baat |'मन की बात' आता पुस्तक रूपात

या प्रकरणी सायबर क्राईम पोलिस ठाण्यात ३ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१९ (२) सह ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-डी अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वरी येथील ६० वर्षीय तक्रारदाराशी २१ ऑगस्ट ते २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अज्ञात व्यक्तींनी विविध मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधला. त्यांना ए८३ डीआय वेल्थ ग्रोथ सेंटर या बनावट गुंतवणूक गटात सहभागी करून घेण्यात आले.

Digital Arrest Scam
Goa Ujjwala Yojana | गोवा उज्ज्वला योजनेचा लाभ सर्व पात्र अर्जदारांना मिळणार, विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

ऑनलाईन शेअर गुंतवणुकीत मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तक्रारदाराकडून आरोपींनी विविध बँक खात्यांमध्ये एकूण ३९,०१,०४७ जमा करून घेतले. विश्वास संपादन करण्यासाठी बनावट गुंतवणूक अॅपवर काल्पनिक नफा दाखविण्यात आला. मात्र, गुंतवणूक केलेली रक्कम आणि कथित नफा परत घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपींनी आणखी पैसे गुंतविण्याची मागणी केली आणि त्यानंतर संपर्क बंद केला.

पोलिस उपनिरीक्षक अनिल पोळेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करत सागर प्रकाश ढोलवी याला २३ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथून, तर अजिंक्य रवींद्र अभंग याला २४ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथून अटक केली. या अटकेमुळे सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम विविध खात्यांमार्फत वळविणाऱ्या आर्थिक नेटवर्कचा शोध घेण्यास महत्त्वाची मदत मिळणार आहे. पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई सायबर क्राइमचे पोलिस अधीक्षक जीवबा दळवी यांच्या देखरेखीखाली तसेच साहाय्यक पोलिस अधीक्षक श्रीदेवी बी. व्ही. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

बँक व्यवहारांच्या तपासातून संशयितांचा माग

गोवा सायबर क्राईम पोलिसांनी बँक व्यवहार, खात्यांची माहिती आणि तांत्रिक पुराव्यांचे सखोल विश्लेषण केले. त्यातून अजिंक्य रवींद्र अभंग याच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यात १०.८० लाख, तर सागर प्रकाश ढोलवी याच्या बँक ऑफ इंडिया खात्यात १२ लाख जमा झाल्याचे निष्पन्न झाले. आर्थिक व्यवहार आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग पुणे परिसरापर्यंत काढला. त्यानंतर गोवा सायबर क्राईम पोलिसांचे विशेष पथक महाराष्ट्रात रवाना करण्यात आले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news