Students Depression (Pudhari File Photo)
गोवा

Vishwajit Rane Health Ministry | सावधान! गोव्यातील 10 टक्के जनता नैराश्याच्या छायेत; 1000 लोकांमागे 100 जण डिप्रेशनमध्ये!

Vishwajit Rane Health Ministry | १००० लोकांमागे १०० जण डिप्रेशनमध्ये! गोव्याच्या बदलत्या जीवनशैलीचा मानसिक आरोग्यावर घाला

पुढारी वृत्तसेवा

पणजी: प्रभाकर धुरी

येणारे शब्द आहेत. राज्यातील लोकसंख्येच्या तुलनेत नैराश्यामध्ये असलेल्या लोकांची टक्केवारी १० टक्के आहे, याचा अर्थ १,००० लोकांमध्ये किमान १०० जण नैराश्य किंवा डिप्रेशनमधून जात आहेत. या १० टक्के लोकांना चिंता आणि निराशा सतावत आहे, असा त्याचा अर्थ निघतो.

राज्यातील आरोग्य संचालनालय आणि टेलिमानस हेल्पलाईन सेवा अशा लोकांना डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी जनजागृती, समुपदेशन आणि औषधोपच्चार याला महत्त्व देत आहेत. गोव्यात आरोग्य संचालनालयाने अलीकडे ९४ गावांत समुपदेशन जागृतीसाठी १५ हवाएंदन अधिक सवे घेक्ल्याचा कवा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केला आहे,

तर आरोग्य संचालनालयाने गेल्या २ वर्षात ठिकठिकाणी २५० जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतले आहेत, अशी माहिती आरोग्य संचालनालयाच्या असंसर्गजन्य आजार विभागाकडून देण्यात आली. दुसरीकडे टेलिमानस या २४७ हेल्पलाईन सेवेसाठी दररोज किमान ६० ते ७० जणांनी संपर्क साधला आहे.

गोव्यात २०२४ मध्ये टेलिमानस सेवा सुरू झाली. आतापर्यंत २६,७१९ जणांनी कॉल करून आपली वेदना मांडली आहे. यातील ४ ते ५ टक्के कॉल हे हाय रिस्क इमर्जन्सी कॉल होते. एकूण लोकसंख्येच्या १० टक्के लोकांना नैराश्य, डिप्रेशन आहे, तर १ टक्का लोकांना गंभीर मानसिक आजार आहेत. त्यांना वेगवेगळे भास होतात, आवाज ऐकू येतात, कुणीतरी आपल्या विरोधात आहे, कुणीतरी आपल्याला मारू पाहतो असे वाटते. या सगळ्या पार्श्वभूमीवर डिप्रेशन संदर्भात आरोग्य विभागाकडून जनजागृती आणि समुपदेशन करण्यात येत आहे.

शाळा, महाविद्यालये, शासकीय संस्था, खासगी कार्यालये येथे हे कार्यक्रम चालतात. शिवाय गावागावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ठराविक दिवशी प्रशिक्षित पर्यवेक्षक आणि वैद्यकीय अधिकारी भेट देतात आणि समुपदेशन करतात. काही ठिकाणी रुग्ण जिल्हा रुग्णालयात जातात, निदान व औषधोपचार घेतात. राज्यात जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत जनजागृती सुरू आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यातील १० टक्के लोकांनी समुपदेशन आणि औषधोपचार घ्यायचे ठरवले तर आरोग्य विभागाकडील मनुष्यबळ कमी पडणार आहे. त्यासाठी गावागावात काम करणाऱ्या पूर्वी गावागावांत सामाजिक नात्याची बोष्ण घट्ट होती. एकमेकांच्या सुखदःखात लोक सहभागी व्हायचे. एकत्र कुटुंब पद्धती होती.

आरोग्यसेविका, मल्टी पर्पज वर्कर्स यांना प्रशिक्षण देऊन जनजागृती, समुपदेशन करण्यासाठी या प्रवाहात आणायला हवे, त्यामुळे मोठ्यांची आणि समाजाची सपोर्ट सिस्टीम भक्कम होती. गरिबी, वंचितता होती. पण, मानसिक आरोग्य ठणठणीत होते. आता परिस्थिती बदलली आहे, गावातील माणसे शहराकडे किंवा गाचे शहरे बनली आहेत. त्यामुळे माणसामाणसांतील बंध कमकुवत होऊ लागले आहेत. त्यातून एकटेपणा आलाय. त्यातून नैराश्य आले आहे.

समुपदेशक आणि टेलिमानस सारखी हेल्पलाईन हाच एकमेव आधार नैराश्यग्रस्तांना बाटतो आहे. एकटी राहणारी व्यक्ती, घटस्फोटीत व्यक्ती, व्यसनी व्यक्ती एखाद्या क्षणी आत्महत्येचा विचार करते. त्यावेळी त्याला आधार देण्याची गरज असते. मी आत्महत्या करीन असे कुणी म्हटले तर, त्याकडे दुर्लक्ष करू नये.

त्याला सामाजिक व मानसिक आधार देऊन त्याच्यावर उपचार करण्याची गरज आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एम. बी. बी. एस. वैद्यकीय अधिकारी असतात, त्यांना आजाराच्या निदानाचे, उपचाराचे प्रशिक्षण दिलेले असते. त्यांनी समोर आलेल्या रुग्णाचे निदान करून औषधोपचार केल्यास डिप्रेशनची समस्या बहुतांशी सुटू शकेल, असे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी सांगितले.

१५ दिवसांनंतरचे नैराश्य हा आजार

एखाद्याला निराश वाटणे हे सामान्य आहे. पण हे नैराश्य १५ दिवस कायम राहिले, तर तो आजार समजायला हवा आणि आजार म्हटला की त्यावर उपचाराची गरज असते. निराशा सामान्य असेल, तर समुपदेशन करून त्या व्यक्तीला बरे करता येते. पण त्याचे आजारात रूपांतर झाले की, सहा महिन्यांचा औषधांचा कोर्स करावा लागतो. योग्य निदान आणि औषधोपचार याने मानसिक आजार बरा केला जाऊ शकतो, असे प्रसिद्ध मानसोपचारतज्ज डॉ. रुपेश पाटकर यांनी सांगितले.

शाळांमध्ये समुपदेशक नेमणारे देशातील पहिले राज्य

गोवा हे शाळांमध्ये समुपदेशक नेमणारे देशातील पहिले राज्य आहे. माध्यमिक आणि उच्च्च माध्यमिक शाळांतील मुलांचे समुपदेशन करण्यासाठी राज्य सरकारने समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. ही बाब समाजाच्या निकोप वाढीच्या दृष्टीने सकारात्मक मानावी लागेल,

बदलती कौटुंबिक, सामाजिक परिस्थिती कारणीभूत

अलीकडे सगळ्याच गोष्टी अस्थिर आहेत. जीवनात स्थिरता नसणे हे एक कारण नैराश्य, डिप्रेशनचे आहे. पूर्वी एखादी गोष्ट मिळावी यासाठी वाट पाहिली जायची, आता प्रत्येक गोष्ट पटकन हवी. त्यातून संयम सुटू लागला. एखादी गोष्ट मिळाली नाही की, नैराश्य येते. हा प्रश्न अलीकडे मुलांच्या संगोपनापासून पाहायला मिळतो.

पूर्वी आई-वडील, शिक्षक यांच्याकडून मुलांना मार्गदर्शन मिळायचे. आता अनेक गोष्टी मोचाईलद्वारे मुलांपर्यंत पोहोचतात आणि अनेक समस्या निर्माण होतात. मुलांची भावनिक बुद्धिमता विकसित होणे त्यासाठी आवश्यक आहे. मुलांना स्वतः व्या भावना ओळखता व हाताळता यायला हव्या. तसेच समोरच्या व्यक्तीच्या डोक्यातील भावना ओळखून त्याला योग्य प्रतिसाद देता यायला हवा. तसे झाले तर अल्प क्यातील प्रेम, आकर्षण आणि त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत व समस्या कमी होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT