goa assembly winter session  Pudhari
गोवा

Mandrem Goa Assembly Election | मांद्रेत 'जीत' आरोलकरांची की आणखी कोणाची?

Mandrem Goa Assembly Election | विरोधक निष्क्रिय : इच्छुकांची हालचाल वाढली; स्थानिक प्रश्न ठरणार निर्णायक

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : निवृत्ती शिरोडकर

मांद्रे मतदारसंघ हा गोव्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचा आणि नेहमीच चर्चेत राहणारा मतदारसंध मानला जातो. सध्या या मतदारसंघात आमदार जीत आरोलकर यांच्या विरोधात कोणताही ठोस आणि सक्रिय विरोधक दिसून येत नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, निवडणुका जसजशा जवळ येतील, तशी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

मांद्रे मतदारसंघातील आगामी विधानसभा निवडणूक ही राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या लदर्तींपैकी एक मानली जाते. या मतदारसंघाचे राजकीय चित्र कधीही बदलू शकते, ही त्याची वैशिष्ट्ापूर्ण ओळख आहे. गेल्या काही महिन्यांपासून विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेते गावागावांत संपर्क वाढवताना दिसत आहेत. अनेकजण निवडणूक लढवण्याची घोषणा करत असले तरी त्यांचा प्रत्यक्ष प्रभाव किंवा सातत्यपूर्ण संपर्क फारसा दिसून येत नाही.

आमदार जीत आरोलकर यांच्या विरोधात प्रभावी विरोधक नसल्याने त्यांची राजकीय स्थिती मजबूत दिसते. त्यांनी मतदारसंघात विकासकामांवर भर दिला असून आरोग्य शिबिरे, महिला मेळावे, युवकांशी संवाद, तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने केले जात आहे. दर महिन्याला विविध प्रकारचे मोठे उपक्रम राबवण्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

पाणीपुरवठा, रस्ते, पूल, हॉट मिक्सिंग, आरोग्य सेवा आणि तुये हॉस्पिटलसारख्या प्रकल्पांवरही त्यांनी वेळोवेळी भर दिला आहे. मांद्रे मतदारसंघ हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मोरजी, मांद्रे, हरमल, आश्वे आणि केरी या किनारी भागांमध्ये वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, स्थानिकांना रोजगार, पर्यटन व्यवसायातील असंतुलन आणि पर्यावरण संवर्धन हे प्रमुख प्रश्न आहेत. हे मुद्दे आगामी निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मतदारसंघात विकासकामे, रोजगार, पर्यटन, वाहतूक, पर्यावरण आणि स्थानिकांना न्याय या मुद्द्यांवर व्यापक चर्चा सुरू आहे. त्यामुळे २०२७ ची निवडणूक ही केवळ राजकीय नसून स्थानिक प्रश्नांवर आधारित निर्णायक लढत ठरण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून गावागावांत बैठका आणि सामाजिक कार्यक्रम वाढले आहेत. आगामी काळात आणखी इच्छुक उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता असून मोठी राजकीय चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि माजी आमदार दयानंद सोपटे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. मांद्रे मतदारसंघ हा नेहमीच अनपेक्षित निकाल देणारा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जनता कोणाच्या मागे उभी ठाकते, हे पाहावे लागेल.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मगोचे आमदार जीत आरोलकर यांनी भाजपचे दयानंद सोपटे यांचा केवळ ७१५ मतांच्या फरकाने पराभव केला होता. सध्या आरोलकर हे सत्ताधारी भाजप आघाडीला पाठिंबा देत असल्याने आगामी निवडणुकीत तिकीट वाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. दयानंद सोपटे यांनी २०१७ मध्ये काँग्रेसकडून विजय मिळवून नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भाजपची पारंपरिक मतपेटी त्यांच्या पाठीशी असल्याने तेही या मतदारसंघावर दावा करण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मागील निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून लबत दिली होती. भाजपमधील अंतर्गत नाराजी दूर करून ते पुन्हा मुख्य प्रवाहात कसे येतात, याकडेही लक्ष लागले आहे. काँग्रेस पक्षासाठी हा मतदारसंघ पुन्हा मजबूत करण्याचे आव्हान आहे. नव्या आणि जुन्या चेहन्यांची सांगड घालताना त्यांना योग्य रणनीती आखाती लागेल, गेल्या निवडणुकीत आरजी पक्षाला मिळालेली मते लक्षणीय होती. 'स्थानिक विरुद्ध परप्रांतीय' हा त्यांचा मुद्दा तरुण मतदारांना कितपत आकर्षित करतो, यावरही बरेच काही अवलंबून असेल.

मोरजी आणि मांद्रे हे भाग कासव संवर्धन आणि शांत पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र वाढत्या व्यावसायिक बांधकामांमुळे मच्छीमार आणि पारंपरिक व्यवसायांवर परिणाम होत असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. 'स्थानिक विरुद्ध बिल्डर लॉबी' हा संघर्ष निवडणुकीत तीव्र होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत गोवा फॉरवर्डचे दीपक कळंगुटकर आणि काँग्रेसचे नारायण रेडकर यांच्याकडेही मतदारांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस, आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड युती झाल्यास उमेदवारी कोणाला मिळेल, हा प्रश्न आज तरी अनुत्तरीत आहे. पार्सेचे माजी सरपंच देवेंद्र प्रभुदेसाई, तसेच मांद्रेचे माजी सरपंच अमित सावंत आणि बाळा उर्फ प्रशांत नाईक हेही निवडणुकीच्या तयारीत असल्याचे दिसते. मोरजीचे माजी सरपंच तसेच माजी जि. पं. सदस्य सतीश शेटगावकर यांनी मोरजी पंचायत क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. गावाच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवून त्यांनी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवले.

ज्या भागांमध्ये रस्ते निर्माण करणे अशक्य मानले जात होते, त्या ठिकाणी स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी रस्त्यांचे जाळे उभे केले आणि नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतीश शेटगावकर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचा सातत्याने संपर्क असून, अनेक नेत्यांनीही त्यांच्याशी संवाद साधल्याची माहिती मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT