दोनापावला येथे पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी व मुंबई येथील चित्रनगरीचे सरव्यवस्थापकीय संचालक उज्ज्वल निरगुडकर. 
गोवा

IFFI Goa| नाशिक आणि नागपूरमध्ये लवकरच नवी 'फिल्म सिटी' होणार

'इफ्फी'मध्ये सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राची संस्कृती आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (ईफ्फी) मध्ये विस्तारपणे दिसावी, यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि त्यामुळेच यावेळी जास्तीत जास्त चित्रपटाचा अंतर्भाव ईफ्फीत झाला आहे, येत्या काळात नाशिक व नागपूर येथे फिल्मसिटीचे बांधकाम सुरू केले जाईल, त्यासाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती महाराष्ट्र सरकारच्या कला व सांस्कृतिक खात्याचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली.

ईफ्फीनिमित्त पणजीत आलेले डॉ. किरण कुलकर्णी यांनी दोणापावला येथे फिल्म बझारमधील महाराष्ट्र दालनात सोमवारी (दि.२३) पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुंबई येथील चित्रनगरीचे सरव्यवस्थापकीय संचालक उज्ज्वल निरगुडकर व सरकारी अधिकारी प्रशांत साधलेकर उपस्थित होते .

डॉ. कुलकर्णी म्हणाले की, मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरी फिल्म सिटीचा सुवर्ण महोत्स महाराष्ट्र सरकार साजरा करत आहेत. त्या निमित्ताने मुंबई येथील फिल्मसिटीच्या माध्यमातून महाराष्ट्रात जास्तीत जास्त नवे चित्रपट तयार व्हावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यंदाच्या ईफ्फी फिल्म बाजार मध्ये महाराष्ट्राचे तीन स्टॉल लावण्यात आले आहेत. इतर कुठल्याही राज्याचे एकापेक्षा जास्त स्टॉल नाहीत, असे सांगून फिल्मसिटी, महाराष्ट्र सरकारचे कला व संस्कृती खाते यांच्या सहकार्यातून मराठी चित्रपट तयार व्हावेत. त्याचबरोबर महाराष्ट्राची वारसा स्थळे, संस्कृती ,पुरातत्त्व स्थळे ,किल्ले देवस्थाने आणि मराठी भाषेच्या विविध बोलीभाषा यांचे मोठ्या प्रमाणात संरक्षण व्हावे, ती चित्रपटाच्या माध्यमातून सर्वदूर पोचावे, यासाठी संस्कृती खाते प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

चित्रपट कथेला पूरक पुस्तके साहित्य अकादमीच्या सहकार्याने चित्रपट निर्माते दिग्दर्शकासाठी उपलब्ध केली जात असून महाराष्ट्र कल्चरल पॅकेज आंतरराष्ट्रीय चित्रपट सृष्टीपर्यंत पोहोचवण्यासाठी शक्य ते सर्व कार्य सरकार करत असल्याचे ते म्हणाले. उज्वल निरगुडकर यांनी महाराष्ट्र सरकारच्या चित्रपट निर्मितीसाठी चालू असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT