Sexual Assault Case  File Photo
गोवा

Goa Sexual Harassment Case | कळस गाठला! विद्यार्थ्यांचे शोषण करणाऱ्या प्राचार्याचे 'बड्या' नेत्यासमोर लोटांगण; कुशावती हादरले

Goa Sexual Harassment Case | मला वाचवा म्हणत, घेतली राजकीय गॉडफादरकडे धाव

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

कुशावती जिल्ह्यातील 'त्या' उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यावर विद्यार्थ्यांचे शारीरिक शोषण केल्याचा गंभीर आरोप दै. 'पुढारी'तून उघडकीस आल्यावर त्याचे धाबे दणाणले आहे. त्या प्राचायनि गुरुवारी स्वतःच्या बचावासाठी एका प्रभावशाली राजकारण्यासमोर लोटांगण घालून मदतीचा धावा सुरू केला आहे.

या प्रकरणात अकरावीतील सुमारे १० विद्यार्थ्यांनी अप्रत्यक्षपणे तक्रारी केल्याचे समोर येत आहेत. मात्र, आवाज उठवल्यास बारावीची परीक्षा देता येणार नाही, अशी थेट धमकी संबंधित प्राचार्याकडून दिली जात असल्याने ती मुले घाबरली आहेत. या धमक्यांमुळे विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांमध्येही तीव्र चिंता आणि संताप व्यक्त होत आहे.

शिक्षण संस्थांमध्येच विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येत असल्याने समाजात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, संबंधित प्राचायनि स्वतःच्या बचावासाठी एका राजकारण्याची मदत घेतली असल्याने या प्रकरणात प्रचंड काळेबेरे लपली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून सत्य बाहेर आणावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT