मुंबई उच्च न्यायालय / Mumbai High court  pudhari file photo
गोवा

Birch Club Goa|लुथरा बंधूंसह तिघे १४ रोजी न्यायालयात शरण येणार, गोवा खंडपीठाने जामीन रद्द केल्याने निर्णय

Luthra brothers court surrender-लुथरा बंधूंसह तिघे १४ रोजी न्यायालयात शरण येणार, गोवा खंडपीठाने जामीन रद्द केल्याने निर्णय

पुढारी वृत्तसेवा

पणजी : हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' क्लब प्रकरणातील आरोपी सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि अजय गुप्ता हे तिघेही येत्या १४ सप्टेंबर रोजी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात शरण येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्यांचा जामीन रद्द केल्यानंतर तिघांनी न्यायालयासमोर आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.

बर्च क्लबला लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान क्लबच्या बांधकामासह विविध परवानग्या, अग्निसुरक्षा उपाययोजना आणि इतर नियमांचे कथित उल्लंघन झाल्याचे तपास यंत्रणांच्या निदर्शनास आले आहे.

या प्रकरणात सौरभलुथरा, गौरव लुथरा आणि अजय गुप्ता यांना यापूर्वी सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला होता. मात्र, या जामिनाला गोवा सरकारतर्फे आव्हान देण्यात आल्यावर उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान प्रकरणातील परिस्थितीचा विचार करून तिघांचा जामीन रद्द केला होता. तसेच त्यांना शरण येण्यासाठी मुदत देण्यात आली होती.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात त्यांनी आव्हान दिले उच्च न्यायालयाच्या जामीन रद्द करण्याच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने तिघांवर शरण येण्याची वेळ आली आहे.

त्यानुसार १४ सप्टेंबरला म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयात तिघेही शरण येणार असून, त्यानंतर न्यायालय त्यांच्या पुढील कोठडीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया यामुळे १४ सप्टेंबरच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT