Goa Bori Sai Baba Temple | बोरी साईबाबा मंदिराचा ताबा ट्रस्टकडे, परिसरात तणावाची स्थिती : पोलिसांनी २१ आंदोलकांना घेतले ताब्यात

तीन गावच्या लोकांनी मंदिरात मांडला होता ठिय्या, परिस्थितीवर पोलिसांचे लक्ष
बोरीत महिलेला ताब्यात घेताना पोलिस.
बोरीत महिलेला ताब्यात घेताना पोलिस.
Published on
Updated on

फोंडा : पुढारी वृत्तसेवा

बोरी येथील श्री साईबाबा मंदिराचा ताबा कुणाकडे असावा, हा वाद चिघळल्याने मंदिर परिसरात तणाव निर्माण झाला. तणावाच्या स्थितीत साईबाबा सेवा मंडळ ट्रस्टकडे पोलिसांच्या उपस्थितीत ताबा देण्यात आला. यावेळी झालेल्या गडबड गोंधळात पोलिसांनी २१ आंदोलकांना ताब्यात घेतले. सध्या तणावाची स्थिती असून, पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सेवा मंडळ ट्रस्टकडे मंदिराचा ताबा सुपूर्द केला. यावेळी मामलेदार, तसेच इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते.

साईबाबा सेवा मंडळ ट्रस्टचे पदाधिकारी शुक्रवारी सकाळी मंदिराचा ताबा घेण्यासाठी पोलिस बंदोबस्तात आले. त्यावेळी मंदिरात ठिय्या मारून बसलेल्या मंदिर परिसरातील तीन गावच्या लोकांनी त्यांना अटकाव केला. त्यामुळे वाद निर्माण झाला. पोलिसांनी लोकांना ताब्यात घेतले.

बोरीतील या साईबाबा मंदिराचा वाद न्यायप्रविष्ट आहे. गेल्या जुलै महिन्यात बोरीतील ग्रामस्थांनी अचानक मंदिराचा ताबा घेतला. यावेळी सेवा मंडळ ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने मंदिराचा ताबा सेवा मंडळ ट्रस्टला सोपवला. पोलिस बंदोबस्तात मंदिराचा ताबा घ्यावा, असे सांगितले. त्यानुसार शुक्रवारी (दि. ११) ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश रायकर व इतर पदाधिकारी गेले असता, त्यांना मंदिरात आधीच ठिय्या मारून बसलेल्या ग्रामस्थांनी अटकाव केला.

बोरीत महिलेला ताब्यात घेताना पोलिस.
Matoli Package Home Delivery | गणेशोत्सवासाठी दक्षिण गोव्यात अभिनव उपक्रम; माटोळीचे पारंपरिक साहित्य थेट तुमच्या घरापर्यंत!

पोलिस उपअधीक्षक शिवराम वायंगणकर, तसेच पोलिस निरीक्षक मोहन गावडे यांच्या सहकार्य देण्याच्या आवाहनाला ग्रामस्थांनी नकार दिल्याने शेवटी मंदिरातील ग्रामस्थांना पोलिसांनी बाहेर काढले. पोलिस बंदोबस्तात २१ महिला आंदोलकांची रवानगी पोलिस स्थानकात केली. सर्व आंदोलकांवर भारतीय न्याय संहिता १२६ कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. फोंडा पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

बोरीत महिलेला ताब्यात घेताना पोलिस.
Eco Friendly Ganesh Utsav | पार्से येथील 90 वर्षांची मूर्तिकलेची परंपरा! न्हायगीणकर कुटुंबाचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा ध्यास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news