Matoli Package Home Delivery | गणेशोत्सवासाठी दक्षिण गोव्यात अभिनव उपक्रम; माटोळीचे पारंपरिक साहित्य थेट तुमच्या घरापर्यंत!

Matoli Package Home Delivery | चतुर्थीपूर्वी माटोळी साहित्याचे 'पॅकेज' ; 12 सप्टेंबरपर्यंत आगाऊ नोंदणीचे आवाहन
Ponda Chaturthi Matoli Bazar
Ponda Chaturthi Matoli Bazar
Published on
Updated on

मडगाव : रविना कुरतरकर
गणरायाच्या स्वागतासाठी सजणाऱ्या माटोळीच्या खरेदीची लगबगही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र, बाजारात जाऊन रानमेवा, फळे आणि पारंपरिक साहित्य जमवाजमव करण्यासाठी वेळ नसलेल्या भाविकांसाठी यंदा माटोळीचे साहित्य घरापर्यंत पोहोचणार आहे.

Ponda Chaturthi Matoli Bazar
Nitin Gadkari Inaugurates | गोवा प्रदूषणापासून मुक्त करा!
Ponda Chaturthi Matoli Bazar
Goa Forward Party | गोव्याच्या राजकारणात मोठी घडामोडी! गोवा फॉरवर्डला काँग्रेसचा मैत्रीचा 'हात'; विजय सरदेसाईंचे मौन

दक्षिण गोव्यातील पारंपरिक माटोळी साहित्य विक्रेत्यांनी घरपोच माटोळी साहित्य देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मडगाव, फातोर्डा, नावेली, वास्को तसेच अन्य शहरांमध्ये चतुर्थीच्या खरेदीसाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे.

पारंपरिक माटोळी साहित्य ग्रामीण भागातून शहरात आणण्यासाठी विक्रेत्यांची लगबग सुरू असून, ग्राहकांनाही माटोळीची प्रत्येक वस्तू वेगवेगळी शोधण्याऐवजी तयार पॅकेज घेणे अधिक सोयीचे ठरत आहे.

Ponda Chaturthi Matoli Bazar
Goa Forward Party | गोव्याच्या राजकारणात मोठी घडामोडी! गोवा फॉरवर्डला काँग्रेसचा मैत्रीचा 'हात'; विजय सरदेसाईंचे मौन

विक्रेत्यांनी १२ सप्टेंबरपर्यंत आगाऊ बुकिंग करण्याचे आवाहन केले आहे. साधारण १ हजार रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंत विविध किमतींची माटोळी पॅकेज उपलब्ध करण्यात आली आहेत. या पॅकेजमध्ये माटोळीसाठी आवश्यक असलेले बहुतांश पारंपरिक साहित्य एकत्रित देण्यात येणार आहे. आगाऊ ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांना काही विक्रेत्यांकडून मोफत घरपोच सेवा दिली जात आहे.
दरवर्षी मडगाव पोलिस स्थानक परिसर, पिंपळ कट्टा आणि लोहिया मैदान येथे माटोळीचा पारंपरिक बाजार भरतो. नेत्रावळी, सांगे, सावर्डे, कुळे, कोळमेडा परिसरातील गावकरी महिला मोठ्या संख्येने शहरात येऊन रानमेवा व माटोळी साहित्याची विक्री करतात. यंदा याच ग्रामीण विक्रेत्यांनी घरपोच सेवेचा पर्याय उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चतुर्थी जवळ आली असून अनेक साहित्याची तयारी बाकी आहे. माटोळीचे पारंपरिक साहित्य शहरात सहज उपलब्ध होत नाही. यंदा या विक्रेत्यांनी माटोळी साहित्य घरपोच करण्यास सुरुवात केल्याने बाजारात जाण्याची धावपळ कमी झाली असून ही सुविधा अतिशय सोयीची ठरत आहे

.- प्रशांती साळकर, स्थानिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news