Dona Paula Jetty Goa 
गोवा

Dona Paula Jetty Goa | पतीशी भांडण अन् टोकाचं पाऊल; गोव्याच्या दोनापावला जेटीवर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

Dona Paula Jetty Goa | दोनापावला जेटीवरील घटना; जीवरक्षकामुळे वाचले प्राण

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

दोनापावला येथील जेटीवरून एका पर्यटक महिलेने पाण्यात उडी घेतली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या जीवरक्षकांनी तत्परता दाखवून पाण्यात उडी घेऊन त्या महिलेला वाचवले. पतीशी झालेल्या भांडणावरून तिने पाण्यात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने दोनापावला जेटी येथे पाण्यात उडी घेतल्याचा कॉल पोलिस नियंत्रण कक्षाकडून आला. पणजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

ते पोहोचण्यापूर्वीच या जेटीच्या ठिकाणी तैनात असलेल्या जीवरक्षक रामकृष्ण याने पाण्यात उडी घेतली. पाण्यात गटांगळ्या खात असलेल्या पर्यटक महिलेला वाचवले व दोरीला बांधून पाण्यातून ओढत तिला किनाऱ्याजवळ आणले.

महिलेने उडी घेतल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या पर्यटकांनी एकच गोंधळ केला व आरडाओरड सुरू केली. या ठिकाणी तैनात असलेल्या जीवरक्षकांनी कोणताही विलंब न लावता त्या महिलेला वाचवले.

पोलिस या घटनास्थळी पोहोचल्यावर पर्यटक महिलेला विश्वासात घेऊन या घटनेची चौकशी केली. त्यावेळी तिने पतीशी झालेल्या कडाक्याच्या भांडणामुळे या ठिकाणी आत्महत्या करण्यास आले होते, असे सांगितले. पोलिसांनी महिलेच्या पतीशी संपर्क साधून तिला त्याच्याकडे स्वाधीन केले. याप्रकरणी कोणताही गुन्हा पोलिसांत दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT