Krishna Naik
लडाखच्या साहसी सफरीवर गेलेल्या फोंडा येथील कृष्णा नाईक याचा मृत्यू  file photo
गोवा

लडाखला गेलेला गोव्याचा कृष्णा हिमालयातच विसावला

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : लडाखच्या साहसी सफरीवर गेलेल्या कासवाडा-तळावली, फोंडा येथील कृष्णा नाईक (वय ३५) याचा कारगिल-लडाख मार्गावर असताना यंदाच्या सफरीत मात्र तो कायमचाच हिमालयात विसावला. प्राणवायूच्या कमतरतेमुळे त्याचा मृत्यू झाला.

कृष्णा नाईक हा फोंडा येथील आल्मेदा हायस्कूलचा कर्मचारी आहे. साहसी सफारीसाठी त्याला ओळखले जायचे. दोन वर्षांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. पत्नी सरकारी खात्यात अधिकारी पदावर कार्यरत आहे. आई, वडिलांच्या म्हातारपणाचा एकमेव आधार असलेल्या कृष्णाच्या संसाराची वेल आताच कुठे फुलत होती; पण त्याची सर्वांत आवडती सफर त्याला मृत्यूच्या दाढेत घेऊन जाईल, असे कोणाला वाटले नव्हते.

श्रीनगरवरून बुलेटने लडाखच्या दौऱ्याला सुरुवात

त्याची अकाली एक्झिट सर्वांना चटका लावून गेली आहे. निरनिराळ्या पर्यटनस्थळांना भेट देण्याचा छंद असलेल्या कृष्णाने यापूर्वी लेह-लडाखसह केदारनाथ, काश्मिर असे अनेक दौरे केले आहेत. मागील वर्षी त्याने मित्रांसोबत लडाखचा दौरा केला होता. यावेळी ते फोंड्याचे चारही मित्र १५ जून रोजी विमानातून गोव्यातून दिल्ली आणि दिल्लीहून श्रीनगरला रवाना झाले. त्याआधी सर्वांनी आपल्या बुलेट आणि इतर साहित्य रेल्वेने पाठवून दिले होते. त्यांनी श्रीनगरवरून बुलेटने लडाखच्या दौऱ्याला सुरुवात केली होती. २०० कि.मी.चा प्रवास करून ते कारगीलमध्ये दाखल झाले. तिथे विश्रांती घेऊन त्यांना पुढील सुमारे २५० किलोमीटरचा प्रवास करून लडाख गाठायचे होते. त्यावेळीही कृष्णाची तब्येत चांगली होती. साहसी मोहिमेसाठी हाच रस्ता ओळखला जातो आणि विशेष म्हणजे तो प्रदेश निर्मनुष्य आणि अविकसित असल्याने कोणत्याही सुविधा तिथे उपलब्ध नाहीत. उंच डोंगराळ भागांतील मार्ग, क्षणाक्षणाला वातावरणात होणारे बदल, अंगाला झोंबणारी थंडी अशा परिस्थितीत डोंगर चढण्याचे आव्हान होते.रून बुलेटने लडाखच्या दौऱ्याला सुरुवात

सायंकाळची वेळ अन् कृष्णाचा श्वास थांबला...!

लडाखच्या साहसी मोहिमेचे आकर्षण अनेक युवकांना आहे. आयुष्यात एकदातरी बुलेट घेऊन लेह लडाखचा दौरा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना लडाख हा प्रदेश जेवढा सुंदर आहे तेवढाच लडाखचा मार्ग आणि तेथील वातावरण प्रतिकूल आहे. याची जाणीव असूनसुद्धा जोखीम घेऊन हा दौरा करताना साहसवीरांना बऱ्याच संकटांचा सामना करावा लागतो. आणि बऱ्याचदा प्राणांनाही मुकावे लागते. कृष्णाच्या बाबतीतही तेच घडले. त्याच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वजण जसजसे वर चढत होते, तसा वातावरणात बदल जाणवत होता. बऱ्याच उंचीवरून ते मार्गक्रमण करत असताना अचानक कृष्णाला श्वासनाचा त्रास जाणवू लागला. त्याने खूण करून मित्रांना थांबायला लावले. त्याला श्वासोश्वास घेण्यास अडचण होऊ लागल्यामुळे पुढे जाणे जिकरीचे होते. अविकसित खडकाळ प्रदेश आणि त्यात सायंकाळची वेळ अशा स्थितीत वैद्यकीय उपचार मिळणे अशक्य होते. चार दिवसांनंतर त्याचे पार्थिव तळावली येथील त्याच्या घरी पाठवण्यात आले. त्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. पार्थिव पाहून आईन हंबरडाच फोडला. पत्नीचा टाहो मन सुन्न करणारा होता. प्रत्येकजण त्याच्या आठवणीने डोळ्यांत पाणी घेऊन होता. अत्यंत शोकाकूल वातावरणात वारखंडे येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत साश्रू नयनांनी कृष्णाला अखेरचा निरोप देण्यात आला.

मन सुन्न करणारा आईचा हंबरडा आणि पत्नीचा टाहो

कृष्णाची प्रकृती खालवू लागल्यामुळे कारगिल भागात संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत होते. पण सुमारे शंभर कि.मी. प्रवास करून रुग्णवहिका पाठवण्यास कोणी तयार झाले नाहीत. आम्ही कितीही पैसे देण्यात तयार आहोत, असे सांगितल्यानंतर एक रुग्णवाहिका तिथे येण्यास तयार झाली. पण त्या रुग्णवाहिकेत कृष्णाचे जीव वाचवण्याससाठी कोणतीही वैद्यकीय सामग्री नव्हती. कसेबसे त्याला रुग्णवाहिकेत घालून कारगील जवळच्या एका रुग्णालयात आणण्यात आले पण तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. त्याच्या शवचिकित्सा अहवाल अजून मिळालेला नाही. पण डॉक्टरांनी मृत्यू दाखल्यात मृत्यूचे कारण कार्डीयोपल्मोनरी अरेस्ट (आजार-अचानक हृदयाचे ठोके थांबणे) असे दिले आहे. पार्थिव पाहून आईन हंबरडाच फोडला. पत्नीचा टाहो मन सुन्न करणारा होता. प्रत्येकजण त्याच्या आठवणीने डोळ्यांत पाणी घेऊन होता.. अत्यंत शोकाकूल वातावरणात वारखंडे येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत साश्रू नयनांनी कृष्णाला अखेरचा निरोप देण्यात आला.

SCROLL FOR NEXT