robbery case Pudhari
गोवा

Goa robbery case | बहुराज्यीय शोधमोहिमेनंतर दरोडेखोर जाळ्यात

दोनापावला, म्हापसा दरोड्याचा उत्तर गोवा पोलिस, क्राईम ब्रँचकडून संयुक्त तपास

पुढारी वृत्तसेवा

पणजी: दोनापावला व म्हापसा दरोड्याचा तपास उत्तर गोवा पोलिस व क्राईम ब्रेचने ये संयुक्तपणे केला गोवा पोलिसांनी दोन B दरोड्यांची उकल बहुराज्यीय शोधमोहीम ने राबवून केली. ही चौकशी आव्हानात्मक 5 असल्याचे पोलिसांनी नमूद केले. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी 1. पथकांना मेघालय, कोलकाता, हैदराबाद, तर दिल्ली आदी ठिकाणी पाठवण्यात आले होते. अखेर गेल्या महिन्यात दिल्लीत आरोपींना अटक करण्यात यश आले. डा टोळीने सीमापार धडक देऊन पळून त जाण्याच्या गुन्हेगारी चक्राचा वापर केला.

या दोनापावला दरोड्यात दरोडेखोर बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले होते, म्हापसा दरोडाप्रकरणी गोवा पोलिसांनी दरोडेखोरांचा हैद्राबादपर्यंत पाठलाग न केला. मात्र, काही तासांपूर्वीच ते मेघालयमार्गे भारतातून बांगलादेशात पसार झाले होते. तपासासाठी गोवा पोलिसांनी आंध्र प्रदेश, तेलंगण, पश्चिम बंगाल, ओडिशा, मेघालय, दिलनी आदी राज्यांमध्ये पथके तैनात केली होती.

बांगलादेशी दरोडेखोर टोळीने निवासी भागांत पूर्वतपास (रेकी) करून दिवस-रात्र नागरिकांच्या हालचालीचे निरीक्षण केले. त्यानंतर टोळीने लहान गटांत विभागणी करून ठरावीक भेटीची ठिकाणे निश्चित केली आणि तंत्रज्ञानाधारित संवाद साधत कारवाया केल्या. लक्ष्यावर हल्ला करण्यापूर्वी ही टोळी जवळच्या जंगलांत लपून बसत असे, अशी माहिती एसपी (क्राइम) राहुल गुप्ता यांनी दिली दरोड्यासाठी वापरलेली शस्त्रे गोव्यातच खरेदी केली असून त्याची माहिती दरोडेखोरांनी उघड कैली आहे. शस्त्रसामग्री जप्त करण्याची कारवाईही सुरू आहे.

गोचा गुन्हे शाखेने दिल्ली पोलिसांकडून सहा दरोडेखोरांपैकी पाचजणांना ११ दिवसांची कोठडी घेतली आहे. त्यामध्ये नूर इस्लाम उर्फ नदीम खान, सैफुल इस्लाम, सोहेल खान, महम्मद सुमन हलदार उर्फ बाबू उर्फ पप्पू व झकीर हलदार याचा समावेश आहे. सहावा दरोडेखोर नासिर खान याला लवकरच दिल्ली पोलिसांकडून गोव्यात आणले जाणार आहे. प्राथमिक तपासात उघड झाले की, ही टोळी बांगलादेशातील बागेरहाट जिल्हह्यातील आहे. मेघालयमार्गे भारतात प्रवेश करून दरोडे टाकणे आणि पुन्हा बेकायदेशीर मार्गाने परत जाणे, ही त्यांची पद्धत होती. नदीम खान हा या टोळीचा सूत्रधार असल्याचा संशय आहे. या घटनांनंतर गोवा पोलिसांनी राज्यभर रात्रीची गस्त वाढवली आहे. संशयास्पद हालचालींची माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी केले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT