Goa MP Sadanand Shet Tanavade 
गोवा

Goa MP Sadanand Shet Tanavade | विकसित भारत स्वप्नपूर्तीचा अर्थसंकल्प : खासदार तानावडे

Goa MP Sadanand Shet Tanavade | केंद्र सरकारने आज देशाचा अर्थसंकल्प मांडला तो विकसित भारत २०४७ बाबत सर्वांचे तसेच पंतप्रधानांचे जे स्वप्न आहे तो दृष्टीकोन समोर ठेवून केलेला आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारने आज देशाचा अर्थसंकल्प मांडला तो विकसित भारत २०४७ बाबत सर्वांचे तसेच पंतप्रधानांचे जे स्वप्न आहे तो दृष्टीकोन समोर ठेवून केलेला आहे. पुढील २१ वर्षातील वाढीचा विचार करण्यात आला आहे. गेल्यावर्षी ५०.६५ लाख कोटीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला तो यावर्षी ५४.१० लाख कोटीचा आहे म्हणजेच यावर्षी त्यात ७.९ टक्के वाढ झाली आहे.

सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ७ टक्के आहे ही चांगली बाब आहे, अशी प्रतिक्रिया गोव्याचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केली. जगभर आर्थिक मंदी तसेच अस्थिरता असताना त्याची तुलना केल्यास हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला चांगली व्याप्ती देणारा आहे. मागील अर्थसंकल्पात भांडवली गुंतवणूक २०२५ - २६ साठी ११ लाख कोटी होती ती या २०२६ २७ साठीच्या अर्थसंकल्पात १२.२ लाख कोटी रुपये आहे.

म्हणजेच भांडवलमध्ये वाढ करण्यात आली आहे. सबका साथ सबका विकास या पंतप्रधानांच्या घोषणेनुसार युवा, गरीब, किसान व महिलांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. आत्मनिर्भर भारतव लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. ऑलिम्पिक गेम्स आयोजिण्याच्या दृष्टीने परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT