Goa Romeo Lane Demolition 
गोवा

Goa Night Club Case | लुथरा बंधूंकडून तपासात असहकार्य

Goa Night Club Case | दंडाधिकारी समिती चौकशी अहवालासही विलंब

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीची दंडाधिकारी समितीला दिलेली आठवड्याची मुदतवाढ संपली मात्र अजून चौकशी संपलेली नाही. थायलंड येथून आणलेल्या लुथरा बंधूंच्या चौकशीतूनही पोलिसांना फारसे काही मिळालेली नाही.

क्लब असलेल्या जमिनीचा मालक सुरेंद्र खोसला असल्याचे माहीत असूनही ल्याचा शोध घेण्यास झालेल्या विलंबाबाबत प्रश्निचिन्ह उभे राहत आहे. हणजूण पोलिस या प्रकरणाचा फौजदारी तपास करत आहेत. संशयित लुथरा बंधू तपासकामात कोणतेच सहकार्य करत नसल्याचा पोलिसांचा दावा आहे.

या नाईट क्लबच्या मूळ बांधकामाशी त्यांचा काहीच संबंध नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. ही जागा त्यांनी भाडेपट्टीवर घेऊन तेथे नाईट क्लब सुरू केला होता. त्यासाठी लागणारे परवाने बनावट करारपत्र तयार करून घेण्यात आल्यासंदर्भात ते काहीच माहिती उघड करत नाहीत. त्यामुळे नाईट क्लब असलेल्या मालमत्तेचा मालक सुरेंद्र खोसला याचा शोध घेण्यासाठी ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काही आठवडे जातील तोपर्यंत अटकेत असलेल्या लुथरा बंधूंची रवानगी न्यायालयीन कोठडीत होईल.

असताना या घटनेला जबाबदार असलेल्यांची चौकशी दंडाधिकारी समितीमार्फत सुरू आहे. या समितीला आठवडाभरात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते मात्र ही चौकशी पूर्ण होण्यास मुदतवाढ देण्यात आली. ही दिलेली आठवडाभराची मुदतवाढ आज संपत आहे मात्र अजून ही चौकशी संपलेली नाही.

या नाईट क्लबविरुद्ध कारवाई करण्यात चालढकलपणा केलेल्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबरच अनेक कर्मचाऱ्यांच्या जबान्या नोंदवण्यात येत असल्याने हा उशीर होत असल्याची माहिती सूत्राने दिली.

या दुर्घटनेनंतर तातडीने चौकशी समिती, इतर आस्थापनांच्या चौकशीसाठी महसूल खात्यामार्फत लेखाजोगा समिती सरकारने स्थापन केल्या मात्र त्याचा अहवाल येण्यास उशीर होत आहे.

तालुकावार कारवाई पथके स्थापन करून बेकायदा सुरू असलेली आस्थापने तसेच इतकी वर्षे सुरू असलेल्या बेकायदा बार व रेस्टॉरंट्स तसेच क्लबविरोधात कारवाई होत आहे. ऐन नाताळ व नववर्षाच्या काळात ही कारवाई होत असल्याने अनेक आस्थापनांचे धाबे दणाणले आहेत. ज्यांच्या आशीर्वादाने हा कारभार सुरू होता त्यांनीही अंग काढून घेतले आहे.

लुथरा बंधू, अजय गुप्ताला आज करणार न्यायालयात हजर

पाच दिवसांची पोलिस कोठडी पूर्ण झाल्याने हडफडे दुर्घटनेप्रकरणी लुथरा बंधूंना उद्या सोमवारी २२ रोजी म्हापसा येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे व पोलिस कोठडी वाढवून घेण्याची मागणी हणजूण पोलिस करणार आहेत तर अजय गुप्ता याला चार दिवसांची वाढीव पोलिस कोठडी पूर्ण झाल्याने न्यायालयात सादर करण्यात येईल.

संशयित अजय गुप्ता आणि सहआरोपी भरत कोहली याच्या जामीन अर्जावर सोमवार दुपारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीपूर्वी तपास अधिकारी दोन्ही संशयितांच्या जामीन अर्जावर आपली बाजू मांडणारे लेखी म्हणणे न्यायालयात सादर करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT