Sex Scandal Case  
गोवा

Sex Scandal Case | विकृतीचा कळस! अश्लील व्हिडीओ दाखवून मारली बढाई; कुडचडे सेक्स स्कँडलचा असा झाला उलगडा

Sex Scandal Case | सामाजिक कार्यक्रमात दाखवले मित्रांना व्हिडीओ

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

कुडचडे सेक्स स्कँडलचा उलगडा एका सामाजिक कार्यक्रमात संशयित सोहम सुशांत नाईक याने पीडितांचे अश्लील व्हिडिओ सहकाऱ्यांना दाखवून बढाई मारल्याने झाला. काही सहकाऱ्यांना त्याने ते व्हिडिओ शेअर केले.

त्याच्या मित्रांनी ते इतरांना शेअर केल्याने या प्रकरणाला वाचा फुटली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या लैंगिक शोषणाच्या व्हिडिओंच्या चर्चा दक्षिण गोव्यात पसरताच स्थानिक पातळीवर संतापाची लाट उसळली आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, गेल्या काही दिवसांपासून कुडचडे आणि काकोडा परिसरात या कथित सेक्स रॅकेटबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. याप्रकरणाचे वृत्त प्रसिद्ध करून त्याचा सातत्याने पाठपुरावा दै. पुढारीने केला.

सुरुवातीला ठोस माहितीच्या अभावामुळे पोलिस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. त्यातच संशयित हा नगरसेवकपुत्र असल्याने पोलिसांवरही मोठा दबाव होता. या पार्श्वभूमीवर कुडचडेतील नगरसेवकांनी पोलिसांची भेट घेऊन ४८ तासांत चौकशी पूर्ण करून कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.

या इशाऱ्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत रविवारी मड्डेगाळ काकोडा येथील संशयित युवक सोहम नाईक याला ताब्यात घेतले. सोहमने नेमके किती अल्पवयीन मुलींना नादी लावले, याची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT