पणजी : पुढारी वृत्तसेवा
हडफडे दुर्घटनेप्रकरणी हडफडे-नागोवा सरपंच रोशन रेडकर व माजी सचिव रघुवीर बागकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज मंगळवारी सत्र न्यायालयाने फेटाळल्याने त्यांच्याविरुद्ध अटकेच्या कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे.
लुथरा बंधूंनी म्हापसा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात सादर केलेल्या सादर अटकपूर्व जामिनावरील सुनावणी ७ जानेवारीला ठेवून त्यांचा अंतरिम आदेश तोपर्यंत कायम ठेवला आहे. बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबकडे आवश्यक असलेले परवान्यांची पडताळणी न करता व्यावसायिक परवाना दिला होता.
हे बांधकाम बेकायदा असल्याने पाडण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर त्याला स्थगिती दिल्यावर व्यावसायिक परवाना मागे घेण्यात पंचायतीकडून प्रथमदर्शनी हलगर्जीपणा झाल्याचे पोलिस तपासकामात उघड झाले आहे. त्यामुळे त्याना अटकपूर्व जामीन फेटाळला गेला आहे.
दरम्यान, लुथरा बंधू हणजूण पोलिसांच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्याविरुद्ध बनवेगिरीचा गुन्हा म्हापसा पोलिस स्थानकात दाखल झाला आहे त्यामध्ये ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी अर्ज दाखल केल्यावर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले आहेत.
या अर्जावर म्हापसा पोलिसांनी न्यायायात उत्तर दाखल केले आहेत. तसेच या आगीत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांनी तीन हस्तक्षेप अर्ज दाखल केले आहेत. या सर्व अर्जावर येत्या ७जानेवारीला सुनावणी होणार आहे.