

पणजी ः म्हादईची न्यायालयीन लढाई गेल्या 2019 पासून सुरू आहे. गोव्याचे सरकर व त्यांचे पथक ही न्यायालयीन सुनावणी अधिक परिणामी व्हावी यासाठी कोणतेच प्रयत्न करत नसल्याचे दिसून येत आहे. या लढ्यासाठी सर्व पक्ष एकत्रित आहेत तरी पण सरकार संरक्षण देऊ शकत नाही ही शोकांतिका आहे, असे मत गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले.
गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची गोव्यात सदिच्छा भेट घेतली. दक्षिण गोव्यातील त्यांच्या मुक्कामादरम्यान ही भेट झाली. या भेटीनंतर त्यांनी म्हादईप्रश्नी आपले विचार व्यक्त केले. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राज्यहिताशी संबंधित विविध मुद्द्यांवर तसेच राजकीय घडामोडींवर सखोल व सकारात्मक चर्चा झाली. सीमावर्ती भागांतील प्रश्न, परस्पर सहकार्य आणि दोन्ही राज्यांच्या हितासाठी समन्वयाने काम करण्याबाबत विचारविनिमय झाले. ही भेट सौहार्दपूर्ण असून रचनात्मक चर्चेसाठी उपयुक्त ठरल्याचे नमूद केले.