पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील तरुणाकडून दोडामार्गमध्ये स्थानिकांवर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मांगेली येथे वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाकडून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. गोवा-महाराष्ट्र सीमेलगतच्या दोडामार्ग शहरात सलग दुसऱ्या रविवारी घडलेल्या धक्कादायक घटनेने सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे.
दोडामार्ग बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीत तरूणीसह संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या एका तरूणाला रोखण्याचा प्रयत्न करणान्या दोन स्थानिक तरूणांवर त्या तरुणाने चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या संबंधित GA-07-E-6051 माहितीनुसार, तरूण-तरूणी कारमधून दोडामार्गात गेले होते. त्यांच्याकडून निर्माणाधीन इमारतीत सुरू असलेला आक्षेपार्ह प्रकार लक्षात आल्यानंतर स्थानिक तरूणांनी त्यांना जाब विचारला. यावेळी झालेल्या वादातून संबधित तरूणाने चाकू काढून कसई दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या भावासह आणखी एका तरूणावर हल्ल्याचा प्रयत्न केला.