Goa Best Tourism State Award  
गोवा

Goa Best Tourism State Award | गोव्याला उत्कृष्ट पर्यटन राज्याचा पुरस्कार

Goa Best Tourism State Award | केंद्रीय मंत्री शेखावत यांच्या हस्ते वितरण; सातत्यपूर्ण प्रगतीचा सन्मान : मुख्यमंत्री

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्याला पुन्हा एकदा उत्कृष्ट पर्यटन राज्याचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार प्राप्त झाला असून केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी पर्यटन संचालक केदार नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते.

पणजी येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय पर्यटन परिषदेच्या समारोप सोहळ्यात 'इंडिया टुडे टुरिझम कॉन्क्लेव्ह अँड अवॉर्डस् 2026' अंतर्गत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशभरातील विविध राज्यांचे पर्यटन मंत्री, धोरणकर्ते तसेच पर्यटन क्षेत्रातील हितधारक या परिषदेस उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, भारताचे पर्यटन क्षेत्र वेगाने विकसित होत असून शाश्वत पर्यटन, सांस्कृतिक जतन आणि अनुभवाधारित पर्यटनाच्या नव्या संधी यावर या परिषदेत सखोल चर्चा झाली.

शाश्वत उपक्रमांना चालना : डॉ. सावंत

गोव्याला मिळालेला हा पुरस्कार राज्याच्या पर्यटन क्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रगतीचा सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले. गोवा 'बियॉन्ड बीचेस' या संकल्पनेला कटिबद्ध असून अंतर्देशीय पर्यटन, आरोग्य पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन तसेच समुदाय-आधारित शाश्वत पर्यटन उपक्रमांना चालना देण्यावर भर दिला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT