पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील मतदारांच्या विशेष सखोल फेरतपासणीनंतर (एसआयआर) एकूण १ लाख ७८ मतदारांची नावे मसुदा यादीतून वगळण्यात आली आहेत. ११ डिसेंबरपर्यंत १० लाख ८४ हजार ९५६ (९१.५५ टक्के) मतदारांचे एन्युमरेशन फॉर्म संकलित करून त्यांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे. सुमारे १ लाख ८२ हजार ८५५ मतदारांचे (८.४५ टक्के) अथवा त्यांच्या आई-वडिलांचे नाव २००२ च्या मतदार यादीत नाही.
मृत मतदार २५५७४ (२.१६ टक्के)
शोधता न येणारे मतदार २९७५० (२.५१ टक्के)
कायम स्थलांतरित मतदार ४०, ४७३ (३.४२ टक्के)
आधीच नोंदणी केलेले मतदार २००८ (०.१७ टक्के)
अन्य श्रेणीतील मतदार २२७३ (०.१९ टक्के
मॅपिंग न झालेल्या मतदारांबाबत सुनावणी घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी दिली. पणजी येथे आयोजित पक्षकार परिषदेत गोयल बोलत होते. ते म्हणाले, (८.४५%) डॉ. संजय गोयल १ लाख ७८ मतदारांना बीएलओंनी योग्य प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आणि फील्ड पडताळणीच्या आधारे साइटला किमान ३ भेटी दिल्यानंतर एएसडीडी म्हणून चिन्हांकित केले आहे.
राज्यात ८ नवीन मतदान केंद्रे स्थापन केली असून दोन मतदान केंद्रे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात मतदान केंद्रांची संख्या १,७३१ झाली आहे. जे मतदार त्यांच्या पत्त्यावर सापडले नाहीत त्यांना दि. १६ डिसेंबर पासून नोटिसा पाठवल्या जातील. त्यांना आपले आक्षेप व दाद मागण्याची संधी पुढील दहा दिवस राहील. ज्यांचे एसआयआर फॉर्म भरले गेले नाहीत, त्यांनी जवळच्या ईआरओशी संपर्क साधून ६ क्रमांकाचा फॉर्म भरावा, अशी सूचनाही त्यांनी केली. ते म्हणाले, बीएलओची बैठक १० डिसेंबर रोजी झाली.
या बैठकीत संकलन न होणाऱ्या गणन अर्ज, एएसडीडी मतदारांची यादी अंतिम करण्यापूर्वी त्यावर चर्चा झाली. बीएलओ-बीएलए बैठकीचे इतिवृत्त सीईओ आणि डीईओएस यांच्या वेबसाइटवर अपलोड केले आहे. गणनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी १२ रोजी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यांना एएसडीडी मतदारांची असंकलन न होणाऱ्यांची यादी देण्यात आली आहे.
ईआरओ सध्या गणन फॉर्मचे मूल्यांकन करत आहेत आणि ईएफची छाननी करण्याचे काम सुरू आहे. मसुदा यादी १६ डिसेंबर रोजी अंतिम यादीसह प्रकाशित केली जाईल आणि ती मतदान केंद्रे, कार्यालये आणि वेबसाइटस् इत्यादींवर उपलब्ध असेल. नाव नोंद न झालेले व्यक्ती मसुद्यावर त्यांचे दावे आणि आक्षेप नोंदवू शकतील, अशी माहिती डॉ. गोयल यांनी दिली.