Goa News Pudhari
गोवा

Goa News | येत्या काळात गोवा धर्मनगरी बनेल

Goa News | आमदार टी. राजा सिंग; 'त्या' अत्याचारांचे गोव्यात संग्रहालय उभारण्यात यावे

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यातील हिंदू समाज जागृत होत असून, येत्या काळात गोवा निश्चितपणे धर्मनगरी बनेल, असे प्रतिपादन हिंदुत्ववादी नेते व तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंग यांनी केले. हिंदू जनजागृती समितीतर्फे पणजी येथे शनिवारी (दि.२३) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे तसेच गोवा संयोजक सत्यविजय नाईक उपस्थित होते.

टी. राजा सिंग यांनी सांगितले की, गोव्यात पोर्तुगीज काळात हिंदूंवर झालेले अत्याचार, उद्ध्वस्त करण्यात आलेली मंदिरे आणि मठ यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत तसेच गोव्यात येणाऱ्या पर्यटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी त्या अत्याचारांचे संग्रहालय गोव्यात उभारण्यात यावे आणि त्याचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, गोव्याच्या किनारी भागांमध्ये बांगला देशी रोहिंग्यांची संख्या वाढत असून, त्यांचा शोध घेऊन त्यांना परत पाठविण्याची गरज आहे. तसेच लव्ह जिहादला आळा घालावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. भारत हिंदू राष्ट्र व्हावे आणि भारतीय संस्कृतीचे संरक्षण व्हावे, यासाठी देशभर दौरे सुरू असल्याचेही ते म्हणाले.

गोव्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत धार्मिक दृष्टिकोनातून जाणून घेत आहेत. इतिहासाचे सत्य समोर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी रमेश शिंदे यांनी सांगितले की, गोवा सरकारने मर्दनगड आणि जुने गोवे येथील हातकातरो खांब संरक्षित वस्तू म्हणून अधिसूचित केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन आहे. मात्र, या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

प्रचारासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर काही अज्ञात व्यक्तींनी स्प्रे मारून विटंबना केल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. काही विरोधकांनी सभेला येणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली असून, ती लोकशाहीविरोधी असल्याचे सांगत आम्ही लोकशाही मार्गाने सभेचे आयोजन केले आहे. गोव्यात लोकशाही मानणारे सरकार आहे, याची जाणीव संबंधितांनी

फोंड्यातील आजच्या सभेला उपस्थितीत राहा

रविवारी, २३ रोजी फोंडा येथील जुन्या बसस्थानकावर सायंकाळी ६ वाजता आयोजित 'हिंदू राष्ट्र जागृती सभा'साठी आपण गोव्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या सभेला हिंदू नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही आमदार टी. राजा सिंग यांनी यावेळी केले. हिंदू धर्मरक्षणासोबतच युवकांना या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी हिंदू जनजागृती समिती कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत हिंदू राष्ट्र व्हावे आणि भारतीय संस्कृतीचे संरक्षण व्हावे, यासाठी देशभर दौरे सुरू असल्याचेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT