पणजी : रिव्होल्यूशनरी गौवन्स पक्षातील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. पक्षाचे अध्यक्ष मनोज परब आणि आमदार वरिश बोरकर यांच्यातील संघर्षान आता वेगळे वळण घेतले असून, या वादामुळे पक्षाच्या राजकीय भवितव्याबाबत राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. आमदार वैरिश बोरकर यांनी आपल्या फेसबुक प्रोफाईलवर 'प्रेसिडेंट, रिव्होल्यूशनरी गोवन्स' असा उल्लेख केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
इतक्या दिवसांच्या वादानंतर आमदार वरिश बोरकर यांनी प्रथमच सोशल मीडियावर सूचक पोस्ट करत 'शांतता' तसेच 'आधी ३९ अ आले, मग त्याचे दुष्परिणाम' असा उल्लेख केला. या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. बोरकर यांच्या या विधानाचा नेमका संदर्भ काय, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, पक्षाध्यक्ष मनोज परब यांनीही फेसबुक पोस्टद्वारे आदित्य देसाई आणि आमदार बोरकर यांच्यावर उघडपणे टीका केली. बोरकरांची ही गैंग पक्ष हडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आधी प्रतिसाद द्या; मगच बैठक दरम्यान, मनोज परब यांचे समर्थक असलेले विश्वेश नाईक, यांनी देखील बोरकरांच्या पोस्टवर टीका करत, खरेच शांतता हवी असल्यास आगामी बैठकांमध्ये चर्चेसाठी उपस्थित राहून दिलेल्या संदेशांना प्रतिसाद देण्याचे तसेच फुटीरतावादी सदस्यांची संगत सोडण्याचे आवाहन केले. या घडामोडींमुळे आगामी काळात पक्षाची दिशा काय असेल आणि हा वाद आणखी तीव्र होणार का, याकडे आता संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले आहे.
'आरजी'ला दोन अध्यक्ष ?
आरजीमधील वाढत्या अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आमदार वैरिश बोरकर यांच्या फेसबुक प्रोफाईलवर अध्यक्ष रिव्होल्यूशनरी गोवन्स अशी नोंद दिसल्याने नवीन चर्चा सुरू झाली आहे. आरजीला आता दोन अध्यक्ष आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र काही जणांच्या मते ख्हिोल्यूशनरी गोवन्स नावाचा एक एनजीओही आहे. त्याचे वरिश बोरकर अध्यक्ष आहेत. पण, आताच प्रोफाईल बदलल्याने वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत.