Goa Crime : सोहमला सशर्त जामीन; कोठडी मात्र कायम

पाचपैकी एका गुन्ह्यात न्यायालयाकडून सुटका
Goa Sex Scandal Case
Goa Sex Scandal Case
Published on
Updated on

पणजी : कुडचडे येथील कथित सेक्स स्कँडल प्रकरणातील संशयित सोहम नाईक याच्याविरुद्ध दाखल केलेल्या पाचपैकी एका प्रकरणात आज बाल न्यायालयाने त्याला सशर्त जामीन दिला. इतर गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत असल्याने जामीन मिळूनही त्याची सुटका होणार नाही.

संशयित सोहम नाईक याच्याविरुद्ध अल्पवयीन मुली तसेच तरुणींनी दिलेल्या तक्रारीनुसार पाच वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँच करत असून मार्च २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात त्याला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कोठडीत आहे. पाचव्या प्रकरणात त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणीवेळी पीडित तरुणीने त्याला विरोध केला नाही, त्यामुळे अर्ज संशयिताने मागे घेतला होता. आतापर्यंत क्राईम ब्रँचने केलेल्या तपासणीनुसार काही तक्रारदार मुलींनी त्यांच्यावरील दबावामुळे या तक्रारी देण्यात आल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे क्राईम ब्रँच पोलिस किती प्रकरणात संशयित सोहम नाईक याच्याविरुद्ध किती आरोपपत्रे दाखल होतात, याकडे काही लोकांचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news