Tourisam  
गोवा

Goa Tourisam | गोव्याच्या पर्यटनाचा झंझावात! 2026 च्या पहिल्या 3 महिन्यांत 28.5 लाख पर्यटकांची विक्रमी नोंद

Goa Tourisam | आखातातील युध्दाचा परिणाम; विदेशी पर्यटकांची संख्या रोडावली

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत राज्यात २८.५ लाख पर्यटकांची नोंद झाली असून, विविध कार्यक्रमांमुळे पर्यटकांच्या आगमनात वाढ सुरूच आहे, तथापि, पश्चिम आशियातील युद्धामुळे राज्याच्या पर्यटन उद्योगाला फटका बसला असून, हॉटेल्स आणि ट्रॅव्हल एजंट्सना विदेशी पर्यटकांच्या आगमनात घट दिसून येत आहे.

पर्यटन खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात आयोजित इंडिया एनर्जी वीकमुळे १२० हून अधिक देशांमधून ७५,००० हून अधिक प्रतिनिधी आणि सहभागी एकत्र आले होते. ज्यामुळे निवास व्यवस्था आणि महसूल वाढीसाठी मदत झाली.

विविध क्रीडा स्पर्धा, उत्सव आणि विवाह सोहळ्यांमुळे देखील काही प्रमाणात महसूल मिळाला, असे पर्यटन खात्याने म्हटले आहे. पर्यटन मंत्री रोहन खवंटे म्हणाले की, २०२६ च्या पहिल्या तिमाहीत पर्यटनाची कामगिरी विक्रमी पातळीजवळ राखणे हे एक पर्यटनस्थळ म्हणून गोव्याच्या सामर्थ्याचे स्पष्ट द्योतक आहे.

Nashik Municipal Corporation |नाशिकमध्ये सिंहस्थापूर्वी हॉकर्स झोनचे फेरनियोजन! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापौरांचा मोठा निर्णयदर्जेदार पर्यटक गोव्यात यावेत यासाठी पर्यटन खात्याचे प्रयत्न सुरू असतात. मोठे जागतिक कार्यक्रम, डेस्टिनेशन वेडिंग्समधील सातत्यपूर्ण वाढ, देशांतर्गत प्रवासाची मोठी मागणी, अधिक स्थिर पर्यटन अर्थव्यवस्था, या सर्वांमुळे आम्हाला एक मजबूत

देशी पर्यटक वाढले : नाईक

नाईक म्हणाले की, 'वर्षभर पर्यटनासाठी योग्य ठिकाण म्हणून राज्याच्या स्थानाने या तिमाहीत पर्यटनाला चालना देण्यात महत्वपूर्ण महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. देशभरातील शहरांशी थेट विमान मार्गांच्या विस्तारामुळे गोवा पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे, परिणामी देशांतर्गत पर्यटकांच्या ओघात लक्षणीय वाढ झाली आहे, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT