Goa Code Of Conduct  
गोवा

Goa Code Of Conduct | गोव्यात निवडणूक आचारसंहिता जानेवारीनंतरच लागू करा; टॅक्सी युनियनची निवडणूक आयोगाकडे मागणी

Goa Code Of Conduct | गोव्यातील पर्यटन व्यवसायावर निवडणूक आचारसंहितेचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन उत्तर गोवा व दक्षिण गोवा टॅक्सी युनियनने निवडणूक आयोगाकडे महत्त्वपूर्ण मागणी केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

शिवोली : पुढारी वृत्तसेवा

गोव्यातील पर्यटन व्यवसायावर निवडणूक आचारसंहितेचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन उत्तर गोवा व दक्षिण गोवा टॅक्सी युनियनने निवडणूक आयोगाकडे महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. ऐन पर्यटन हंगामात निवडणूक आचारसंहिता लागू केल्यास पर्यटनाशी संबंधित विविध व्यवसायांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे निवडणूक आयोगाने जानेवारी महिन्यानंतरच आचारसंहिता लागू करावी, अशी लेखी विनंती युनियनने केली आहे.

गोव्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. नोव्हेंबर ते जानेवारी हा कालावधी गोव्यातील पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक गोव्यात येतात. त्यामुळे टॅक्सी व्यावसायिकांसह हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटन वाहतूक आणि इतर व्यावसायिकांना रोजगार व उत्पन्नाच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात. अशा महत्त्वाच्या पर्यटन हंगामात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यास पर्यटनविषयक उपक्रम, व्यावसायिक व्यवहार आणि दैनंदिन कामकाजावर मर्यादा येण्याची शक्यता आहे.

याचा थेट परिणाम टॅक्सी व्यावसायिकांसह पर्यटन क्षेत्राशी संबंधित हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर होऊ शकतो. त्यामुळे पर्यटन व्यवसायाचे हित आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करण्याच्या वेळेबाबत योग्य निर्णय घ्यावा. जानेवारीनंतरच आचारसंहिता लागू करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी उत्तर व दक्षिण गोवा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष सुनील नाईक, सचिव निशान सालगावकर यांच्यासह युनियनचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT