महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी समाजमनाचा उद्वेग टिपेला Pudhari File Photo
गोवा

Goa Soham Naik Case | नराधम सोहम नाईकचा सैतानी चेहरा! एकाच कुटुंबातील ३ सख्ख्या बहिणींचे लैंगिक शोषण; गोव्याला फुटला घाम

Goa Soham Naik Case | सोहमचे कारनामे उघड : क्राईम ब्रँचकडून घराची झडती

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

विकृत कारवायांनी संपूर्ण गोव्याला हादरवून सोडलेल्या काकोडा-कुडचडे येथील नगरसेवक पुत्र सोहम नाईक याचे थक्क करणारे अनेक कारनामे समोर येत आहेत. अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या सोहमने आणखी तीन सख्ख्या बहिणींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या तिन्ही बहिणींसह अन्य एक पीडिता तयार झाल्यामुळे सोहम नाईक विरोधात पुन्हा अन्वेषण विभागाकडे भक्कम पुरावे उपलब्ध झाले आहेत. दरम्यान, गुरुवारी क्राईम ब्रँचने सोहमच्या घराची झडती घेतली. सोहम नाईक याच्या अत्याचार प्रकरणाची व्याप्ती कुशावती जिल्ह्यासह फोंडा तालुक्यापर्यंत पोहोचली आहे.

या सर्व प्रकरणातील संशयित आरोपी एकच असल्यामुळे त्याच्या विरोधातील सर्व गुन्हे एकत्रितरित्या सोडवण्याकरिता हे प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आले आहे. गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्याकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे.

गुरुवारी परेश नाईक यांनी माधेगाळ काकोडा येथील सोहम नाईक याच्या घराची झडती घेतली. घरातील काही सदस्यांकडेही त्यांनी चौकशी केल्याचे समजते. सोहम नाईक याने अनेक अल्पवयीन मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले होते. त्यांचे अश्लील व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी तो देत असल्याचे आरोप आहेत. त्यामुळे त्याला अटक केल्यावर देखील पीडित मुली तक्रार नोंदवण्यासाठी समोर येत नव्हत्या

आणखी मुली येणार पुढे

एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींचे लैंगिक शोषण केल्याचा सोहमवर यापूर्वी आरोप ठेवण्यात आला होता. मात्र, अन्य एका कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींचेही त्याने लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. आणखी काही पीडित मुलींनी सोहमविरोधात जबानी देण्याची तयारी दर्शवल्याचे कळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT