Valvanti River Pollution  Pudhari
गोवा

Valvanti River Pollution | चाळवंटी नदीत कचरा; पर्यटकांची दंगामस्ती

Valvanti River Pollution | मोर्लेवासीयांमधून संताप; परिसर अस्वच्छ होत असल्याने बंदी घालण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी वृत्तसेवा

सत्तरी तालुक्यातील मोर्ले येथील ळवंटी नदीकिनारी असलेल्या 'उभो गो' डोहात बाहेरील पर्यटकांकडून रु असलेल्या आंघोळ व गामस्तीमुळे स्थानिकांमध्ये तीव्र राजी व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या रोधाकडे दुर्लक्ष करून सुरू सलेल्या या प्रकारांमुळे येथे पंटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची गणी जोर धरत आहे.

पेळावदा-मोलें परिसरातून हणाऱ्या वाळवंटी नदीच्या या डोहात हाळ्याच्या दिवसांत गोव्याच्या विध भागांतून मोठ्या प्रमाणावर र्यटक येतात. अनेकजण नदीत आंघोळ करून नदीकिनारीच अन्न शिजवतात व जेवण करतात. मात्र त्यानंतर प्लास्टिक, काचेच्या बाटल्या व इतर कचरा तसेच टाकून जात असल्याने परिसर अस्वच्छ होत असून दुर्गधी पसरत आहे.

याशिवाय काही पर्यटक दारूच्या नशेत मोठ्या आवाजात संगीत लावून दंगामस्ती करतात. त्यामुळे स्थानिक नागरिक तसेच शांततेत सहल करणारे इतर पर्यटकही त्रस्त होत आहेत. काचेच्या बाटल्या फोडल्यामुळे परिसर अधिक धोकादायक बनला आहे. या डोहात अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

गेल्या दोन वर्षांत दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोहता न येणे, पाण्याची खोली न समजणे तसेच मद्यधुंद अवस्थेत पाण्यात उतरणे ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. मोर्लेतील 'उभो गुणो', 'मथले तळप' व 'करकार' या डोहांमध्ये वाढत्या गैरप्रकारांमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे बाताबरण आहे.

स्थानिक तरुणांकडून पर्यटकांना रोखण्याचे प्रयत्न केले जात असले तरी त्याचा फारसा परिणाम होत नसल्याचे दिसून येते. दरम्यान, मोर्ले ग्रामपंचायतीने नदीकिनारी 'आंघोळीला बंदी' दर्शविणारे फलक लावले आहेत. मात्र पर्यटकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पेळावदा व मोर्ले केसरकरवाडा येथील नागरिकांनी गेल्यावर्षी सत्तरी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून 'उभो गुणों' येथे बाहेरील पर्यटकांवर बंदी घालण्याची मागणी.

नदी प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर

नदी प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पर्यटकांकडून टाकण्यात येणारा कचरा, टाकाऊ अत्रपदार्थ व मद्याच्या बाटल्यांमुळे वाळवंटी नदीचे पाणी दूषित होत आहे. हेच पाणी पुढे साखळी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे जात असल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. पावसाळ्यात हा कचरा नदीत वाहून जाऊन प्रदूषणात आणखी भर पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

पर्यटकांनी आदेशांचे पालन करावे. जे कोणी आदेशाचे उल्लंघन करतील, अशा पर्यटकांवर कारवाई करण्यात येईल.
- अमित शिरोडकर, सरपंच,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT