साळ : पुढारी वृत्तसेवा
डिचोली तालुक्यातील साळ येथील प्रसिद्ध गडे उत्सवाच्या रात्री भाविकांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही उपस्थिती लावली. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, वास्कोचे आमदार संकल्प आमोणकर, डिचोली मतदारसंघाचे माजी आमदार नरेश सावळ,
माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय शेट्ये, तसेच साबाजी शेट्ये, रवळू शेट्ये आणि दिलीप धारगळकर यांनी होळी व देवतांचे दर्शन घेतले. तीन रात्री चालणाऱ्या या उत्सवाच्या तिसऱ्या रात्री, गुरुवारी खासदार सदानंद शेट तानावडे आणि आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी उत्सवस्थळी भेट दिली.
श्री महादेव भूमिका देवस्थानचे माजी अध्यक्ष कालिदास राऊत, माजी सचिव विशाल परव, तसेच लाडू परब, सगुण राऊत, मुकुंद परब, शांबा घुरे आणि महाजन तसेच ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या समवेत माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय शेट्येही उपस्थित होते.