weather update pudhari photo
गोवा

Panaji Weather Forecast |"जुलै महिन्यात वाढला पारा अन् पावसाची दडी! गोव्यात तब्बल 62 वर्षांतील दुसरे सर्वाधिक तापमान"

Panaji Weather Forecast | "गेल्या 24 तासांत राज्यभरात 1 मिमीही पाऊस नाही!; पुढील ६ दिवस गोवेकरांना सोसावा लागणार उन्हाचा चटका"

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

जुलै म्हणजे पावसाचा महिना! मात्र, पावसाने दडी मारली असून चक्क ऊन पडत आहे. पाऊस नसल्याने राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे. २४ तासांत पणजीत कमाल ३३.३ अंश तर किमान २७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान मागील ६२ वर्षांतील जुलै महिन्यातील दुसरे सर्वाधिक कमाल आणि किमान तापमान ठरले आहे.

गेल्या २४ तासांत राज्यभरात १ मिमीही पाऊस पडला नाही. पुढील सहा दिवसांत राज्यात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

१ जून ते १३ जुलै दरम्यान राज्यात सरासरी ३५.७३ इंच पावसाची नोंद झाली आहे. या दरम्यान राज्यात ५२.०५ इंच पावसाची नोंद होते. यंदा पावसाचे प्रमाण ३३ टक्क्यांनी कमी आहे.

राज्यात १ जून ते १३ जुलै दरम्यान काणकोणमध्ये सर्वाधिक ४९.७८ इंच पावसाची नोंद झाली आहे. धारबांदोडा येथे ४३.५५ इंच, सांगेमध्ये ४०.६१ इंच, मडगावमध्ये ३९.५८ इंच, पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, राज्यात १८ जुलैपर्यंत कमाल तापमान ३३ ते ३४ अंश, तर किमान तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT