नीलेश राणे यांचा सत्कार करताना चिरेखाण व्यावसायिक  
गोवा

Goa Quarry Rate Issue | गोव्यातील वाढीव दराचा प्रश्न अखेर मार्गी

चिरेखाण व्यावसायिकांनी मानले आमदार नीलेश राणेंचे आभार !

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : तालुक्यातील चिरेखाण व्यावसायिक आणि गोव्यातील व्यापारी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला चिऱ्यांच्या वाढीव दराचा वाद अखेर पूर्णपणे मिटला आहे. शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी मध्यस्थी करत यावर योग्य तोडगा काढल्याने स्थानिक चिरेखाण व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या यशस्वी मध्यस्थीबद्दल सावंतवाडीतील चिरेखाण व्यावसायिकांनी आमदार निलेश राणे यांचा नागरी सत्कार करून त्यांचे आभार मानले.

गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गातील चिरेखाण व्यावसायिक आणि गोव्यातील व्यापारी यांच्यात चिऱ्यांच्या दरावरून तीव्र मतभेद सुरू होते. दोन्ही बाजूंच्या अनेक बैठका होऊनही तोडगा निघत नसल्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होते. या गंभीर समस्येकडे जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचे लक्ष वेधले. त्यानंतर संजू परब यांनी आमदार नीलेश राणे यांच्याकडे या विषयात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.

विषयाचे गांभीर्य ओळखून आमदार राणे यांनी तात्काळ गोव्याचे आमदार आर्लेकर यांच्या निवासस्थानी दोन्ही बाजूंच्या घटकांची संयुक्त बैठक घडवून आणली. या बैठकीत चिरेखाण व्यावसायिकांची बाजू ठामपणे मांडत. त्यांना वाढीव दर मिळालाच पाहिजे असा आक्रमक आग्रह आमदार राणेंनी धरला. त्यांच्या या भूमिकेमुळे व्यापाऱ्यांनी वाढीव दर देण्यास मान्यता दिली.

या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावंतवाडी येथील शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार निलेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद सदस्य सुदनआमदार निलेश राणे खंबीरपणे पाठीशी उभे राहिल्यामुळेच हा जटिल कवठणकर आणि उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नाडिस यांच्यासह तालुक्यातील चिरेखाण व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रश्न निकाली निघाल्याचे सांगत, भविष्यात सर्व चिरेखाण व्यावसायिक निलेश राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि ते घेतील तोच निर्णय अंतिम मानतील, असा विश्वास सुदन कवठणकर यांनी या वेळी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT