Rangana Fort Students Rescued | रांगणा गडावर जंगलात ४ विद्यार्थिनी भरकटल्या

सिंधुदुर्ग पोलिसांना शोधण्यात यश; विद्यार्थी सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजचे
Rangana Fort Students Rescued | रांगणा गडावर जंगलात ४ विद्यार्थिनी भरकटल्या
Published on
Updated on

कुडाळ : ऐतिहासिक किल्ले रांगणा गडावर पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटून खाली उतरताना वैद्यकीय (एमबीबीएस) विद्यार्थ्यांचा गट घनदाट जंगलात भरकटल्याची थरारक घटना शुक्रवारी घडली. या गटातील चार विद्यार्थिनींचा रस्ता चुकल्याने त्यांच्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला होता. घटनेची माहिती मिळताच कुडाळ आणि ओरोस पोलिस ठाण्याचे पथक रांगणा गडाच्या दिशेने रवाना झाले आणि त्यांना शोधण्यात यश मिळाले.

Rangana Fort Students Rescued | रांगणा गडावर जंगलात ४ विद्यार्थिनी भरकटल्या
Tiger News : आंबोली वनपरिक्षेत्रात १२ पट्टेरी वाघ!

मिळालेल्या माहितीनुसार, भावी डॉक्टरांचा हा गट नारूर मार्गे रांगणा गडावर पर्यटनासाठी गेला होता. पर्यटन आटोपून गडावरून खाली उतरत असताना अचानक चार मुलींचा रस्ता चुकला आणि त्या घनदाट जंगलात भरकटल्या. त्यांना शोधण्यासाठी गटातील इतर चार-पाच मुले जंगलात पुढे गेली; परंतु धुकं, मुसळधार पाऊस आणि निसरड्या वाटांमुळे ती मुलेही भरकटली. काही वेळाने कसाबसा मार्ग काढत या विद्यार्थ्यांनी ओरोस पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची आपबिती सांगितली.

Rangana Fort Students Rescued | रांगणा गडावर जंगलात ४ विद्यार्थिनी भरकटल्या
Sindhudurg News : सिंधुदुर्गात भातशेतीला उतरती कळा!

सकाळी दहा वाजता हे विद्यार्थी रांगणागडवर फिरण्यासाठी गेले होते. वाटेत झाड पडल्याने त्यांची चुकामूक झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ओरोस पोलिसांनी तत्काळ कुडाळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच कुडाळ पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक जयदीप पाटील हे आपल्या पथकासह रांगणा गडाकडे रवाना झाले होते. तत्पूर्वी, ओरोस पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news