Revolutionary Goan Party: 
गोवा

Revolutionary Goans Party | आरजीपीतील अंतर्गत संघर्ष तीव्र

Revolutionary Goans Party | बोरकरांना रोखण्याचा डाव; सांत आंद्रे गटाचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून - रेव्ह्युल्युशनरी गोवन्स पक्षात (आरजीपी) सुरू असलेले मतभेद व - संघर्ष आणखी तीव्र झाले आहेत. पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांना - पक्षावर स्वतःचे वर्चस्व ठेवायचे आहे व इतरांना पुढे करून ते आमदार वरिश बोरकर यांना राजकीयदृष्ट्या रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा गौप्यस्फोट आरजीपीच्या सांत आंद्रे गटाने केला.

मंगळवारी सांत आंद्रे येथे आरजीपीच्या पत्रकार परिषदेत बोलताना गटाचे पदाधिकारी तुषार गावस सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून पक्षाकडून तसेच इतरांकडून सुरू असलेल्या आरोपांना कोणताही आधार नाही व ते बिनबुडाचे आहे. त्यामुळे आमदार वीरेश बोरकर हे अधिक त्याला उत्तर देऊ इच्छित नाहीत. योग्य वेळ आल्यावर या एकूण प्रकरणांचा समाचार घेत ते पर्दाफाश करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या आरजीपीच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत तब्बल ८० टक्के सदस्यांनी पक्ष विसर्जित करण्याची भूमिका घेतली होती व तेव्हाच हा पक्ष विसर्जित होण्याच्या वाटेवर होता. मात्र मनोज परब यांचे निकटवर्तीय असलेले आमदार बोरकर यांनीही फोन करून या निर्णयाबद्दल माझे मत विचारले होते. तेव्हा या निर्णयाला मी विरोध दर्शविला होता. आमदार बोरकर हे काँग्रेसमध्ये जाणार असल्यामुळे ते आरजीपीला दाद देत नाही अशा अफवा परब समर्थकांकडून उठविल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT