Helmet Pudhari
गोवा

Goa off the record | रस्ता काय तुमच्या वडिलांचा...!

Goa off the record | रस्ता काय तुमच्या वडिलांचा...!

पुढारी वृत्तसेवा

मडगाव खारेबांध येथील वाईन शॉप चालवणारे एक नगरसेवक सध्या बरेच चर्चेत आहेत. हे नगरसेवक दुचाकी चालवताना ना हेल्मेट, किंवा चार चाकी चालवताना ना सीटबेल्ट वापरतात. त्यामुळे या महिन्याभरात सुमारे तीन वेळा त्या नगरसेवकाला वाहतूक पोलिसांनी अडविले तर आपण नगरसेवक आहे हे तुला माहीत नाही का? आपल्याला कायदे शिकविण्याची गरज नाही.

तुमची बदलीच करून टाकणार अशी तंबी त्या नगरसेवकाने वाहतूक पोलिसांना दिल्यावर ते गप्पच राहिले. परवा तर हद्दच झाली ते नगरसेवक आपल्या पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर स्वार होऊन फोनवर गप्पा मारत होते. यावेळी ते एका वृद्ध जोडप्याला धडक देता देता थोडक्यात वाचले. त्यांच्याजवळ माफी मागण्याचे सोडून या नगरसेवकाने त्यांना हा रस्ता काय तुमच्या वडिलांचा आहे, फुटपाथवर चालता येत नाही का तुम्हाला असे म्हणून त्यांच्यावर खेकसले.

मंत्र्यांचे पोलिसांना आव्हान

हल्लीच गोवा पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने एका वर्षापूर्वी गोव्यात झालेल्या दरोडेखोरांचा शोध लावण्यात मोलाची कामगिरी बजावली. त्याबद्दल मंत्री रोहन खंवटे यांनी पोलिसांचे अभिनंदन केले. मात्र, राज्यात सुरू असलेल्या चोऱ्या व घरफोड्यांचा शोध लावणाऱ्या पोलिसांना ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यामुळे ते पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तसेच तपासकामावर बोट ठेवत आहेत की त्यांचे कौतुक करत आहेत हेच कळत नाहीत.

पोलिसांना बक्षीस जाहीर करून मंत्री खंवटे यांना काय म्हणायचे आहे हे त्यांनाच ठाऊक. एकीकडे पोलिसांवर भ्रष्टाचाराचा आरोप होत असताना हे बक्षीस जाहीर करणे म्हणजे पोलिसांना काम करण्यासाठी आमिष दाखवण्यासारखे तर नाही ना?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT