

पणजी : आम आदमी पक्षाचे माजी राज्य अध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी शुक्रवार, दि. १० एप्रिल रोजी अलुआ येथील खुल्या मैदानावर गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, एल्टन डीकॉस्टा, ॲड. कार्लुस फेरेरा, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी आमदार धर्मा चोडणकर, उपाध्यक्ष एम. के. शेख, सुनील कवणठणकर, माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर, ओबीसी चेअरमन शरद चोपडेकर, एसटी चेअरमन रामकृष्ण जल्मी, महिला प्रदेशाध्यक्ष प्रतीक्षा खलप, युवक अध्यक्ष अर्चित नाईक, सेवा दल अध्यक्ष राजन घाटे, जवाहर बाल मंच अध्यक्ष पलागिया रापोसो, जिल्हाध्यक्ष शशांक नार्वेकर, मंगलदास नाईक व असिस नोरोन्हा, सांताक्रुझ ब्लॉक अध्यक्ष जॉन नझारेथ, उत्तर गोवा युवक काँग्रेसचे अध्यक्ष ट्रेव्हर फर्नांडिस आणि सांताक्रुझ मतदारसंघातील इतर नेते व अनेक नागरिक उपस्थित होते.