Goa Niwas  
गोवा

Goa Niwas Delhi Authentic Goan Food |दिल्लीतील गोवा निवासमध्ये अस्सल गोवन जेवण देणार

मंत्री दिगंबर कामत : नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

Renovated Goa Niwas Delhi Authentic Goan Food Digambar Kamat

पणजी : नवी दिल्लीतील गोवा निवासमध्ये अस्सल गोवन खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जातील. या भोजन सेवेचे व्यवस्थापन करण्यासाठी अस्सल गोवन खाद्यपदार्थ पुरवण्यास सक्षम असलेल्या एका गोवन कंत्राटदाराची नियुक्ती केली जाईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी नवी दिल्ली येथे केली.

राजधानी दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरात असलेल्या गोवा निवासाचे सुमारे सोळा कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले आहे. शुक्रवारी या वास्तुचे उद्घाटन झाले. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, गोव्याचे साबांखा मंत्री दिगंबर कामत, दिल्लीचे शिक्षण मंत्री आशीष सुद आदी उपस्थित होते. आधुनिक वास्तुरचना आणि अद्ययावत सुविधांनी सज्ज झालेल्या या गोवा निवासात दिल्लीमध्ये गोव्यातून येणारे नागरिक, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांसाठी निवासाची सोय असेल.

देशाच्या राजधानीत येणाऱ्या गोमंतकीयांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच गोव्याची संस्कृती आणि ओळख जपण्याच्या प्रयत्न नूतनीकरण करताना करण्यात आलेला आहे. दिल्लीमध्ये विविध शासकीय कामे, बैठका, कार्यक्रम आणि अन्य कारणांसाठी येणाऱ्या गोमंतकीय नागरिकांना या निवासाचा लाभ होणार आहे.

गोवेकर, दिल्लीवासीयांना फायदा : रेखा गुप्ता

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, गोवा सरकारने गोवा निवास ही एक मौल्यवान मालमत्ता निर्माण केली आहे. या सुविधेचा फायदा दिल्लीला भेट देणाऱ्या गोवेकरांना आणि दिल्लीतील नागरिकांनाही होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT