विधानसभेत आज म्हादईच्या प्रश्नासंदर्भात आमदार मायकल लोबो यांनी आवाज उठविला.  Pudhari News Network
गोवा

Michael Lobo Calangute Resort | कळंगुटमध्ये आमदार मायकल लोबो यांना मोठा धक्का! नाझरी रिसॉर्टच्या बेकायदेशीर बांधकामावर अखेर पडला हातोडा

Michael Lobo Calangute Resort | कळंगुटमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्याशी संबंधित असलेल्या नाईकवाडा-कळंगुट येथील नाझरी रिसॉर्टच्या काही बेकायदेशीर बांधकामाच्या भागावर अखेर हातोडा पडला. न्यायालय बेकायदेशीर बांधकामांची गय करणार नाही असे संकेत या कारवाईने दिले आहेत. या कारवाईमुळे रिसॉर्टचे सुमारे ३० खोल्यांचे बांधकाम पाडण्यात आल्याने कोट्यवधीचे नुकसान व कारवाईची चर्चा कळंगुट परिसरात सुरू झाली आहे.

या रिसॉर्टचा काही भाग बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तो पाडण्याचा आदेश दिला होता. मात्र या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्यात आले होते.

या न्यायालयाने ते फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने दिलेला आदेश ग्राह्य ठरविला होता. त्यामुळे या रिसॉर्टच्या व्यवस्थापनाने बेकायदेशीर बांधकाम ३१ मे २०२६ पर्यंत स्वतःहून पाडण्याची हमी दिली होती. या तारखेपूर्वी बांधकाम पाडण्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते, मात्र तारीख उलटून गेली तरी ते पाडले न गेल्याने राज्य प्रशासनाने कालपासून कारवाईस सुरुवात केली.

बेकायदेशीर बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पाडण्याचे काम सुरू करण्यात आले असून घटनास्थळी महसूल, पंचायत आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहून संपूर्ण कारवाईवर देखरेख ठेवून आहेत. यावेळी घटनास्थळी पोलिस बंदोबस्तही ठेवला गेला होता.

मूळ याचिकादाराची अवमान याचिका

नाझरी रिसॉर्टचे अनधिकृत बांधकाम ३१ मेपर्यंत पाडून पूर्ण करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते व तसे आश्वासन रिसॉर्ट व्यवस्थापनाने दिले होते. मात्र, त्याचे पालन न केल्याने उच्च न्यायालयात मूळ याचिकादाराने अवमान याचिका सादर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT