Dombivli hoarding safety issue : होर्डिंग उभारणीचे काम नियमांना हरताळ फासून सुरू

उंचावर जीव धोक्यात घालून काम, कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
Dombivli hoarding safety issue
होर्डिंग उभारणीचे काम नियमांना हरताळ फासून सुरूpudhari photo
Published on
Updated on

नेवाळी : मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्यभरात होर्डिंगच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले असताना डोंबिवली -अंबरनाथ महामार्गावरील खोणी गावाजवळ होर्डिंग उभारणीसाठी सुरू असलेल्या कामामध्ये सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. उंचावर लोखंडी सांगाडा उभारण्याचे काम सुरू असताना कामगार कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने न वापरता काम करत असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

खोणी गावाजवळ महामार्गालगत मोठ्या आकाराचे होर्डिंग उभारण्यासाठी लोखंडी सांगाडा उभारण्याचे काम सुरू आहे. यासाठी क्रेनच्या सहाय्याने लोखंडी सांगाड्याचे भाग उचलून बसविले जात आहेत. मात्र, या कामादरम्यान उंचावर काम करणाऱ्या कामगारांनी सेफ्टी हार्नेस, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट अथवा अन्य आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Dombivli hoarding safety issue
Panchgani News : पाचगणीत जीव धोक्यात घालून विद्युत कामे

विशेष म्हणजे, संबंधित ठिकाण हे वर्दळीच्या महामार्गाला लागून असल्याने अपघात झाल्यास केवळ कामगारांनाच नव्हे तर रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनाही धोका निर्माण होऊ शकतो. कामगारांच्या सुरक्षेसंदर्भातील नियमांचे पालन केले जात आहे का, तसेच संबंधित विभागाकडून परवानग्या आणि सुरक्षा मानकांची तपासणी करण्यात आली आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

अलीकडील काळात होर्डिंग दुर्घटनांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कामांमध्ये सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Dombivli hoarding safety issue
Palghar News : डहाणू ते चारोटी रस्त्याचे काँक्रीटीकरण रखडले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news