Government housing scheme Pudhari
गोवा

Shramdham Housing Scheme | डिसेंबरपर्यंत श्रमधामचे 100 वे घर करणार पूर्ण

Shramdham Housing Scheme | मंत्री डॉ. तवडकर; पैंगीण येथील नुकसानग्रस्त महिलेस श्रमधामच्या माध्यमातून मदत

पुढारी वृत्तसेवा

चावडी : पुढारी वृत्तसेवा

गोरगरिबांना श्रमधाम योजनेतून घरे बांधून देण्याकरिता दाते व स्वयंसेवकांनी सहकार्य केल्यानेच आतापर्यंत काणकोण व गोव्याच्या विविध भागांत ७२ घरे बांधणे शक्य झाले. पैंगीण म्हालवाडा येथील शोभा पागी याचे ७३ वे, तर मार्ली बांधण्यात येणारे ७४ वे घर, तर येत्या डिसेंबरपर्यंत आणखीन २६ घरे बांधून १०० घरांचा आकडा पूर्ण करण्यात येईल, असे काणकोणचे आमदार तथा मंत्री व श्रमधामचे संकल्पक डॉ. रमेश तवडकर यांनी सांगितले.

पैंगीण म्हालवाडा येथील शोभा भागी यांच्या राहत्या घरावर गेल्यावर्षी भले मोठे फणसाचे झाड पडून घराचे मोठे नुकसान झाले होते व ते घर श्रमधाम योजनेतर्फे बांधून देण्याचे डॉ. तवडकर यांनी जाहीर केली होते.

त्या घर बांधून देण्याच्या कामाचा शुभारंभहोते. केल्यानंतर बोलत यावेळी पैंगीण पंचायतीच्या सरपंच सविता तवडकर, त्याची मुलगी यज्ञा तवडकर, उपसरपंच सुनील पैंगणकर, जिल्हा पंचायत सदस्य अजय लोलयेंकर पंच सतीश पैंगीणकर, क्षत्रिय पागी समाजाचे अध्यक्ष रुद्रेश नमशीकर, घराचे मुख्य अभियंते विनय तुबकी, महेश नाईक चंद्रिका पागी, वासुदेव पागी, डॉ. पुष्पा अय्या, रमेश वेळीप, तेजस नाईक गावकर, प्रमोद देविदास, प्रसाद पागी व श्रमधामचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

सरपंच सविता तवडकर यांनी बलराम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे बांधण्यात येणाऱ्या श्रमधाम संकल्पनेची माहिती दिली. चंद्रिका पागी व शोभा पागी यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले. यावेळी सुनील पैंगणकर यांनी जमीन मालक संदीप फळदेसाई व शोभा भागी यांना आश्रम दिलेले व्यंकटराय नाईक यांचे आभार व्यक्त केले.

अजून ४० घरे बांधणार : तवडकर

श्रमधामतर्फे घरे बांधण्याकरीता अजून ४० नावे आली असून ती बांधण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतली आहे, तीही पूर्ण करण्यात येईल, असे डॉ. मंत्री तवडकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT