file photo
गोवा

Goa Dug Case |"अमलीपदार्थ तस्करीप्रकरणी संशयित 'डुडू'चा जामीन हायकोर्टाकडून कायम! तपास यंत्रणा 'एनसीबी'ची याचिका फेटाळली"

Goa Dug Case |अमलीपदार्थ तस्करीप्रकरणी संशयित 'डुडू'चा जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून कायम; एनसीबीची याचिका फेटाळली

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

अमलीपदार्थ तस्करीप्रकरणी संशयित असलेल्या डेव्हिड ड्रिहॅम ऊर्फ डुडू याच्या जामिनाविरोधात दाखल केलेली नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची (एनसीबी) याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळली आहे.

न्यायमूर्ती नीला गोखले यांनी संशयिताने जामिनाच्या अटींचे सातत्याने पालन केले असून तपासात सहकार्य केले असल्याने त्याचा जामीन कायम ठेवण्याचा निर्णय दिला. न्यायालयाने नमूद केले की, ४ जून २०२५ रोजी आरोपीला जामीन मिळाल्यापासून त्याने तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केले आहे.

त्याने जामिनाच्या कोणत्याही अटींचा भंग केलेला नाही. तसेच, खटल्यात आरोप निश्चित झाल्याने आरोपीला पुन्हा कोठडीत पाठविण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

यापूर्वी म्हापसा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अटकेची कारणे स्वतंत्रपणे लेखी स्वरूपात न दिल्याव्या कारणावरून (दिल्याच्या कारणावरून) ड्रिहॅमला जामीन मंजूर केला होता.

मात्र, उच्च न्यायालयाने हा आदेश कायदेशीरदृष्ट्या त्रुटीपूर्ण असल्याचे नमूद करत तो रद्द केला. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, संबंधित दंडाधिकाऱ्यांनी लागू कायदे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा पुरेसा विचार केला नव्हता.

तथापि, गेल्या वर्षभरातील आरोपीचे समाधानकारक वर्तन, तपासातील सहकार्य आणि जामिनाच्या अटींचे पालन लक्षात घेऊन न्यायालयाने त्याला पुन्हा एनसीबीच्या ताब्यात न देता २० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि एक किंवा दोन जामीनदारांच्या हमीसह नव्याने जामीन मंजूर केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT