पणजी : पुढारी वृत्तसेवा
हरमल आणि मोरजी या प्रसिद्ध समुद्र किनारी भागांत दोन रशियन महिलांचा गळा चिरून निघृण खून केल्याप्रकरणी संशयित असलेला ३७ वर्षीय रशियन नागरिक आलेक्सी लिओनोव याने आपण केवळ एक-दोन नव्हे, तर पंधरा जणांना जीवनातून 'मोक्ष' दिला असल्याचा दावा केल्याने गोवा पोलिसही हादरले आहेत.
एका खुनाचा तपास सुरू असताना दुसरा खून उघडकीस आला. त्यानंतर या रशियन युवकाने गोव्यात तसेच हिमाचल प्रदेशातही अनेकांना जीवनातून 'मोक्ष' दिल्याचे, म्हणजेच खून केल्याचे सांगितले आहे. तो खरे बोलतो आहे की पोलिसांची दिशाभूल करत आहे, याची सखोल पडताळणी पोलिस करत आहेत. दरम्यान, दोन महिलांच्या हत्याप्रकरणी त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
आपण लोकांना 'मोक्ष' देत असल्याचा दावा संशयित करत असून, या दोन्ही महिलांनाही आपण मोक्ष दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. तसेच हिमाचल प्रदेशातही काही जणांना मोक्ष दिल्याचे, म्हणजेच खून केल्याचे त्याचे म्हणणे आहे. मात्र, या माहितीची खातरजमा झाल्याशिवाय पुढील कारवाई केली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या संशयिताने दिलेली माहिती खरी ठरल्यास, एक मोठे हत्याकांड उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तिघांचेही वय ३७ वर्षे
गुरुवारी एलिना कास्तानोव्हा या ३७ वर्षीय रशियन युवतीचा हरमल वामणभाटी येथे गळा चिरून खून झाल्याचे उघड झाल्यानंतर शुक्रवारी एलिना वानिवा या आणखी एका ३७ वर्षीय रशियन युवतीचा मृतदेह मोरजी येथे आढळून आला. तिचाही गळा चिरून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे दोन्ही मृत महिलांचे वय ३७ वर्षे असून संशयिताचे वयही ३७ वर्षे आहे.
आधी मैत्री नंतर खून खून
करण्यात आलेल्यांत महिला व पुरुषांचा ही समावेश असल्याचे संशयित पोलिसांना सांगत आहे. आपण प्रथम जवळीक साधायचो व मैत्रीपूर्ण संबंध निर्माण खून धारदार हत्याराने गळा चिरून करण्यात आला आहे. याप्रकरणी सध्या गोवा पोलिस कसून तपास करीत असून, वरिष्ठ अधिकारीही या प्रकरणाचा तपास करण्यात गुंतले आहेत.
संशयिताकडून शारीरिक अत्याचार...
संशयिताने रशियन हा महिला व युवतींनाच प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, असे तपासात निष्पन्न झाले आहे. प्रेम संबंध जुळल्यानंतर शारीरिक संबंधही प्रस्तापित करून त्यानंतर वेगवेगळे अत्याचार करायचा अशी माहिती पोलिसांनी दिली.
खून करणे यात आपला हातखंडा
करून नंतर खून करायचो व हाच आपला हातखंडा असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले आहे. हरमल व मोरजी येथे दोन रशियन महिलांचा खून केल्याची कबुली रशियन नागरिक आलेक्सी लिओनोव याने दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दुहेरी खूनप्रकरणातील दोन्ही महिलांचा