

पणजी : गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाच्या नावाखाली राज्याची प्रतिमा बदनाम करणारे इव्हेंटस् आणण्याचा प्रयत्न होत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पष्ट नियम, पारदर्शक परवाने व कारवाई होण्याची गरज आहे, अशी मागणी लक्षवेधी सूचनेवरील चर्चेवेळी करण्यात आली.
गोव्याची बदनामी करणाऱ्या इव्हेंटस् स्विरुद्ध ठोस पावले उचलण्यासाठी इव्हेंटस् धोरण पर्यटन खात्यातर्फे तयार करण्यात येत असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्ता, कार्लोस फेरेरा, विजय सरदेसाई, वेन्झी व्हिएगस, क्रूझ सिल्वा आणि विरेश बोरकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.