Electricity Bill Increase Pudhari
गोवा

Goa Electricity Bill Penalty | वीज बिलांवरील दंड शुल्क माफ

Goa Electricity Bill Penalty | मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय; सुधारित बिले लवकरच

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात वाढीव वीज बिलांमुळे आणि अतिरिक्त वीज भारवरील (लोड) दंडात्मक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज सरकारने घेऊन त्यासंदर्भातची सुधारित बिले लवकरच जारी केली जाणार आहे. नागरिकांमध्ये नाराजी वाढल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्य विद्युत अभियंता यांच्यासोबत तातडीची बैठक घेऊन या विषयावर चर्चा केली.

बैठकीनंतर मुख्य विद्युत अभियंत्यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, अतिरिक्त वीज वापर किंवा मंजूर भारापेक्षा अधिक लोडमुळे आकारण्यात आलेले सर्व दंड शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना पुढील दोन दिवसांत जारी केली जाणार आहे.

याशिवाय, ज्या ग्राहकांनी आधीच दंडासह वीज बिलाचा भरणा केला आहे, त्यांना दिलासा देण्यासाठी पुढील बिलांमध्ये संबंधित रक्कम समायोजित केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार नाही अलीकडे राज्यभरातून वाढीव वीज बिले, स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया आणि मंजूर भारापेक्षा जास्त वापरावर आकारण्यात येणाऱ्या दंडाबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट मीटर स्थापनेची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचे निर्देशही दिले आहेत. वीज विभागाकडून आ ग्राहकांच्या मंजूर भाराची पडताळण करण्यात येणार असू आवश्यकतेनुसार भारवाढीसा प्रक्रिया सुलभ केली जाणार आ वाणिज्यिक आणि औद्योगिन ग्राहकांपासून ही पडताळणी मोहीम सु होऊन त्यानंतर निवासी ग्राहकांच समावेश करण्यात येणार असल्यान माहिती देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT