Delay in Action after Inquiry in Goa 
गोवा

Goa - चौकशी झाली; मात्र कारवाईत चालढकल

Delay in Action after Inquiry in Goa- लुथरा बंधूंसह सर्व संशयित जामिनावर; खटला सुनावणी प्रतीक्षेत

पुढारी वृत्तसेवा

पणजी : हणजूण येथील बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबला भीषण आग लागून झालेल्या पाच महिने उटलून गेले आहेत. याप्रकरणाला जबाबदार असलेले लुथरा बंधूंसह क्लबचे अधिकारी जामिनावर सुटले आहेत. चौकशी अहवाल तयार झाला असला तरी कारवाईकडे चालढकलपणा सुरू आहे. हणजूण पोलिसांनी याप्रकरणी तीन महिन्यांत आरोपपत्र सादर केले. मात्र, त्यावर अजून सुनावणी सुरू झालेली नाही. या अग्निकांडमध्ये मृत्यू झालेल्या काहींच्या कुटुंबीयांना सरकारी भरपाई मदत पोहोचवली आहे.

अग्निकांड घटनेवेळी क्लबचे मालक गौरव व सौरभ लुथरा व क्लबच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांना अटक झाली होती. आरोपपत्र सादर होईपर्यंत पोलिसांनी तपासकामाच्या नावाखाली तसेच पुरावे गोळा करण्यासाठी त्यांना जामिनावर कसेच बाहेर येऊ दिले नाही. २५ जणांचा बळी गेल्याने न्यायालयानेही हे प्रकरण गंभीर घेतले होते. हणजूणचे माजी सरपंच तसेच माजी सचिवांना अटक झाली. या प्रकरणाची चौकशी सरकारी स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत झाली. मात्र त्यात कोण जबाबदार याचा उलगडा अखेरपर्यंत झाला नाही. माजी पंचायत संचालक व माजी प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य सचिवांना सरकारने घटनेच्या दुसऱ्याच दिवशी तत्काळ निलंबित केले होते. कालांतराने त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. या प्रकरणाची खोलवर चौकशी झाली असती तर काही राजकारणीच त्यामध्ये अडकले असते, अशी चर्चा आहे.

यावरून सरकारी यंत्रणेकडून सुरुवातीला हे प्रकरण गंभीर घेतले गेले. मात्र, जसजसा काळ लोटत गेला तसतसे या प्रकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत गेला. त्या २५ जणांच्या मृत्यूला अप्रत्यक्षपणे जबाबदार असलेले सरकारी अधिकारी मात्र नामानिराळे राहिले. हणजूण पंचायतीच्या माजी सरपंच व माजी सचिवांवर खापर फोडण्यात आले. बांधकाम बेकायदेशीर असताना त्यांनी नाईट क्लबला व्यापार परवाना दिला असा आरोप ठेवला आहे.

पाजरी मृत्यू पावलेल्यांच्या या नाईट क्लवला लागलेल्या आगीची स्वेच्छा दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने घेतली. क्लबचे २० कर्मचारी व ५ पर्यटकांचा नाहक बळी क्लब व्यवस्थापनाच्या व सरकारी यंत्रणेच्या बेपर्वाईमुळे गेला. कुटुंबियांचा पत्ता शोधून त्यांना भरपाई त्यांच्या घरी पोहचवण्याचे काम सरकारने घेत खंडपीठाच्या कचाट्यातून आपली सुटका करून घेतली. याप्रकरणाची जिल्हाधिकारी स्तरावर चौकशी सुरू असल्याचे सांगून हे प्रकरण थोपवण्याचा प्रयत्न केला. अखेर या चौकशीतून सरकारी यंत्रणेतील कोणालाच जबाबदार न धरता यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना तसेच कडक प्रतीबंधात्मक उपाय याची मार्गदर्शक तत्वे काढण्यात आली.

हणजूण येथील वर्च बाय रोमियो लेन नाईट क्लब हा गेली अनेक वर्षे कोणताही परवाना नसताना सुरू होता, हे हणजूण पंचायतीला माहीत असूनही सर्व काही चिडीचूपणे सुरू होते. या क्लबचे बांधकाम मिठागरची जमीन बुजवून करण्यात आले होते. त्याला परवाना नसताना ते बेकायदेशीर बांधण्यात आले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करत अखेर पंचायत सरपंच व सचिवांवर कारवाई झाली. ईडीनेही त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोताचा शोध घेण्यासाठी बंगल्यावर छापे टाकले.

एखाद्या आस्थापनाला परवानगी देण्यापूर्वी पंचायत व्यापार परवाना हा सक्तीचा असतो. त्यासाठी आरोग्य, प्रदूषण नियंत्रण मंडळ, बीज, पेयजल, अन्न व औषध प्रशासन या खात्यांची परवानी लागते. मात्र गोव्यात किनारी भागांत हे परवाने नसलेली अनेक आस्थापने बिनदिक्कतपणे सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT