Goa news  
गोवा

Goa Dairy Milk Price Hike | गोव्यातील दूध उत्पादकांचा 'गोवा डेअरी'ला इशारा; 8 दिवसांत दरवाढ न केल्यास आंदोलनाचा पवित्रा

Goa Dairy Milk Price Hike | दूध उत्पादकांची मागणी; सरकारने लक्ष देऊन समस्या सोडविण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

फोंडा : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील दूध उत्पादक नाहिसे होण्याच्या मार्गावर असून सरकारने दूद्ध उत्पादकांच्या समस्यांकडे त्वरित लक्ष घालून दूध खरेदी दरात वाढ करावी, अशी मागणी राज्यातील दूध उत्पादकांनी केली आहे.

बुधवारी दूध उत्पादकांनी गोवा डेअरीचे प्रशासकीय समितीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर यांना यासंबंधीचे निवेदन सादर केले असून ८ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ८ दिवसांत योग्य निर्णय न घेतल्यास दूध उत्पादक पुढील निर्णय घेतील, असा इशारा दूध उत्पादकांनी दिला आहे.

गायीच्या दुधाला प्रती लिटर १० रुपये तर म्हशीच्या दुधाला १५ रुपये दरवाढ दूध उत्पादकांनी मागितली आहे. उत्कर्ष दूध उत्पादक संघटनेचे संजीव कुंकळ्येकर तसेच अनुप देसाई, राजेंद्र देसाई व इतर दूध उत्पादक उपस्थित होते.

गेल्या ९ महिन्यांपासून दूध दर फरक दूधवाल्यांना मिळाला नसल्याचे संजीव कुंकळ्येकर म्हणाले. सरकारची कामधेनू योजना पुन्हा सुरु करण्यासाठी दूध उत्पादकांनी तगादा लावल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आली पण त्यात सातत्य नसल्याचे दूध उत्पादक म्हणाले.

विचारविनिमय करून नंतरच निर्णय

आतपर्यंतच्या सत्तेवर आलेल्या सरकार आणि इतर आमदारांनी दूध उत्पादकांच्या समस्यावर गंभीरपणे विचार केल्याचे कुणाला माहीत नाही, असे अनुप देसाई म्हणाले. दरम्यान, गोवा डेअरीला दूध उत्पादकांनी दिलेल्या निवेदनावर विचारविनिमय करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे प्रशासकीय समितीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT