अटक केलेल्या संशयितासमवेत हणजूण पोलिस Pudhari photo
गोवा

Goa cyber crime UPI fraud arrest|संशयित त्रिपुरातून ताब्यात, यूपीआय ट्रांजेक्शनच्या माध्यमातून केली होती २.९३ लाखांची फसवणूक

Goa Cyber Crime police arrest a suspect in Tripura over a 2.93 lakh UPI financial fraud investigation- सायबर क्राईम; संशयित त्रिपुरातून ताब्यात, हणजूण पोलिसांची कारवाई; गोव्यातील एकास २.९३ लाखांना घातला गंडा

पुढारी वृत्तसेवा

हणजूण : पुढारी वृत्तसेवा

हणजूण पोलिसांनी सायबर हॉक कृती अंतर्गत २.९३ लाखांच्या सायबर फसवणुकीप्रकरणी पोराग देब्बार्मा (वय २१) या त्रिपुराच्या संशयित युवकास त्रिपुरा येथून ताब्यात घेऊन गोव्यात आणले. मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताने येथील एका स्थानिकास यूपीआय ट्रांजेक्शनच्या माध्यमातून सायबर फ्रॉड करून सुमारे २.९३ लाख रुपये स्वतःच्या बँक अकाऊंटमध्ये वळवून एटीएमद्वारे काढून घेतले.

आपली फसवणूक झाल्याचे कळाल्यानंतर स्थानिकाने हणजूण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साईश शेटगावकर यांनी कैलास मांद्रेकर, संतोष आणि स्वप्निल या पोलिस सहकाऱ्यांच्या सहकार्याने सायबर हॉक कृती अंतर्गत तपासकाम करून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित पोराग याला त्रिपुरा येथून त्रिपुरा पोलिसांच्या सहकार्याने अटक करून गोव्यात आणले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT