Crime (File Photo)
गोवा

Goa Crime - बाणावली परिसरात आईसह मुलास मारहाण

बाणावली परिसरात आईसह मुलास मारहाण-कोलवा पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : बाणावली परिसरात आई व मुलाला केलेल्या मारहाणीच्या गंभीर घटनेमुळे खळबळ उडाली असून, सेर्नाभाटी बीच तसेच अॅक्सोना-ओडलेम भाट येथे घडलेल्या या प्रकारप्रकरणी कोलवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅल्विन फर्नाडिस (रा. अक्सोना, ओडलेम भाट, बाणावली) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.०३ ते रात्री ८.३० या वेळेत सेर्नाभाटी बीच येथे आरोपी डेलरॉय फर्नाडिस (रा. अक्सोना, ओडलेम भाट, बाणावली) याने तक्रारदाराचा गळा दाबून मारहाण केली तसेच त्याला आणि त्याच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर तक्रारदार परतल्यानंतर आरोपी डेलरॉय फर्नांडिस हा एका अज्ञात साथीदारासह तेथे घरी पोहोचला. दोघांनी मिळून तक्रारदारावर पुन्हा हल्ला करत त्याला मारहाण केली. दरम्यान, तक्रारदाराची आई मध्ये पडल्यावर आरोपीने तिच्यावर अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर आरोपीने आणखी चार अज्ञात व्यक्तींना सोबत घेऊन बेकायदेशीर जमाव तयार करत पुन्हा तक्रारदारावर हल्ला चढवला.

यावेळी तक्रारदाराला बांधण्याचा प्रयत्न करत त्याला मारहाण करण्यात आली, तसेच त्याच्या नाकाला दुखापत होऊन रक्तस्राव झाला, याशिवाय आरोपींनी तक्रारदाराच्या आईची दुचाकी तोडफोड करून नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी कोलवा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 115(2), 351(3), 118(1), 352, 79, 74, 189(2), 191(2), 127 (2) सह 190 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT