Sambhajinagar news : महापालिका स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्यांना न्यायालयात आव्हान file photo
गोवा

Colva Police Station | प्रेयसीचे लैंगिक शोषण; संशयिताला जामीन मंजूर

Colva Police Station | इन्स्टाग्रामवर एका युवतीशी मैत्री करून तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी अटक केलेल्या राजेंद्र सैनी (वय २८) याला दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.

पुढारी वृत्तसेवा

सासष्टी : इन्स्टाग्रामवर एका युवतीशी मैत्री करून तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी अटक केलेल्या राजेंद्र सैनी (वय २८) याला दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.

एक लाखांचा वैयक्तिक बाँड आणि ५० हजार रुपयांचा एक हमीदार सादर करणे, कारागृहातून सुटका झाल्यानंतर पाच दिवस सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी २ ते ५.३० या वेळेत कोलवा पोलिस ठाण्यात हजर राहणे, तक्रारदार युवती किंवा तिच्या कुटुंबाशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधू नये.

तसेच त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर कोणतीही टिप्पणी करू नये. संशयिताने त्याचे सर्व चालू मोबाईल नंबर पोलिसांना द्यावेत आणि कोणताही नवीन सिम कार्ड वापरू नये. तसेच दर १५ दिवसांनी आपले गुगल मॅप लोकेशन तपास अधिकाऱ्यांना व्हॉट्सअॅप किंवा ई-मेलद्वारे पाठवावे.

संशयिताने त्याचे पॅन कार्ड आणि बँक खात्यांचा तपशील पोलिसांना सादर करणे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणतीही मालमत्ता विकू किंवा हस्तांतरित न करणे, गोव्याबाहेर जायचे असल्यास दोन दिवस आधी पोलिसांना कळवावे लागेल आणि तिथला पत्ता द्यावा लागेल आदी अटीवर त्याला जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणाची माहिती आणि आदेशाची प्रत उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांना देखील पाठवण्याचे निर्देश सत्र न्यायाधीश सुधीर शिरगावकर यांच्या न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना दिले आहेत. संशयित मूळ उत्तर प्रदेशातील मथुरा येथील रहिवासी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT